South Korea : दक्षिण कोरियामध्ये मार्शल लॉ लागू!

South Korea

राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांनी आपत्कालीन भाषणात घोषणा केली


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : South Korea दक्षिण कोरियामध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांनी मंगळवारी आपत्कालीन भाषणात ही घोषणा केली. राष्ट्रपती यून सुक येओल यांनी आपल्या राष्ट्रीय भाषणात सांगितले की, देशात मार्शल लॉ लागू केला जात आहे. राष्ट्रपतींच्या आपत्कालीन भाषणाचे देशभरात थेट प्रक्षेपण करण्यात आले.South Korea


  • Ratapani Sanctuary : मध्य प्रदेशातील रतापाणी अभयारण्य व्याघ्र प्रकल्प घोषित

मंगळवारी उशीरा राज्य टेलिव्हिजनवरील भाषणात, अध्यक्ष येओल यांनी दावा केला की ते “निर्लज्ज प्रो-उत्तर कोरिया-राज्यविरोधी शक्ती” नष्ट करतील. म्हणून, मी आणीबाणीचा मार्शल लॉ घोषित करतो.” तथापि, त्यांनी अण्वस्त्रधारी उत्तर कोरियाकडून कोणत्याही विशिष्ट धोक्याचा उल्लेख केला नाही.

यासोबतच राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांनी मार्शल लॉ हे देशाच्या स्वतंत्र आणि घटनात्मक व्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक उपाय असल्याचे वर्णन केले. पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पाबाबत त्यांचा पक्ष ‘पीपल्स पॉवर पार्टी’ आणि विरोधी डेमोक्रॅटिक पार्टी यांच्यातील तीव्र वादानंतर राष्ट्रपतींनी ही घोषणा केली आहे. उल्लेखनीय आहे की, 300 सदस्यांच्या संसदेत बहुमत असलेल्या विरोधी पक्षाच्या खासदारांनी काही दिवसांपूर्वी एक छोटासा अर्थसंकल्पीय प्रस्ताव मंजूर केला होता.

Martial law imposed in South Korea

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात