विशेष प्रतिनिधी
स्पोर्टस् डेस्क : Lionel Messi अर्जेंटीनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी भारतात 3 दिवसांच्या ‘GOAT इंडिया’ दौऱ्यावर आहे. फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या हस्ते महाराष्ट्र सरकारच्या प्रोजेक्ट महादेवाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, टायगर श्रॉफ, आर. अश्विन आणि फुटबॉलपटू सुनील छेत्री उपस्थित होते.Lionel Messi
यावेळी सचिन तेंडूलकर यांनी मेस्सीला क्रिकेट जर्सी भेट दिली. तसेच, मेस्सीनेही सचिन यांना फुटबॉल भेट दिला.Lionel Messi
या कार्यक्रमाला क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, फुटबॉलपटू सुनील छेत्री, अभिनेता अजय देवगण, अमृता फडणवीस, प्रफुल्ल पटेल, माणिकराव कोकाटे आणि इतर अनेक दिग्गज उपस्थित होते. अमृता फडणवीस यांनी मेस्सीसोबत एक सेल्फीदेखील काढला.Lionel Messi
वानखेडेवर दुमदुमला सचिन, सचिनचा जयघोष
अनेक वर्षांनी पुन्हा एकदा वानखेडे स्टेडियममध्ये सचिन.. सचिन.. सचिन आवाज पुन्हा एकदा दुमदुमला. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील यावेळी उपस्थित होते. सचिन तेंडुलकरने यावेळी मेस्सीसोबत हस्तांदोलन करत त्यांची जर्सी मेस्सीला भेट दिली. हा क्षण अनेक क्रिकेट चाहते आणि फुटबॉल चाहत्यांनी आपल्या डोळ्यात तसेच कॅमेऱ्यात कैद केला.
शनिवारी रात्री उशिरा सुमारे 2.30 वाजता मेस्सी कोलकाता विमानतळावर पोहोचला. सकाळी 11 वाजता त्याने आपल्या 70 फूट उंच पुतळ्याचे व्हर्च्युअल उद्घाटन केले. यावेळी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानही उपस्थित होता. सॉल्ट लेक स्टेडियममध्ये ते सुमारे 1 तास थांबणार होता, पण 22 मिनिटांनंतरच तेथून निघाला. यामुळे संतप्त चाहत्यांनी स्टेडियममध्ये खुर्च्या फेकून तोडफोड सुरू केली. त्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थितीही निर्माण झाली.
मेस्सी दुपारी 2 वाजता कोलकाताहून निघाले आणि सायंकाळी 5 च्या सुमारास हैदराबादला पोहोचला. तो रात्री 8 वाजता उप्पल स्टेडियमवर पोहोचला. येथे सहकारी खेळाडू रॉड्रिगो डी पॉल आणि लुईस सुआरेझ यांच्यासोबत मिळून त्यांनी प्रेक्षकांकडे फुटबॉल फेकला. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही मेस्सीची भेट घेतली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माफी मागितली
यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना माफी मागावी लागली. एडीजी कायदा आणि सुव्यवस्था जावेद शमीम यांनी सांगितले की, मुख्य आयोजक सताद्रू दत्ता यांना अटक करण्यात आली आहे. आयोजकांनी तिकीटाचे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले आहे. भारतीय फुटबॉल महासंघाने सांगितले आहे की हा त्यांचा कार्यक्रम नाही.
15 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदींना भेटणार
मेस्सी युनायटेड नेशन्सच्या बाल संघटना UNICEF चे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत, या अंतर्गत ते भारतात ‘GOAT इंडिया’ दौरा करत आहेत. मेस्सीला 4 शहरांचा दौरा करायचा आहे. यात हैदराबाद, मुंबई आणि नवी दिल्ली यांचाही समावेश आहे. 15 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीने त्यांचा दौरा संपेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App