गेल्या महिन्यात, उत्तर कोरियाने पहिल्यांदाच कबूल केले की त्यांनी युक्रेनियन सैन्याविरुद्ध लढण्यासाठी रशियाला सैन्य पाठवले आहे.
विशेष प्रतिनिधी
सोल : Kim Jong उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग-उन यांनी विशेष ऑपरेशन्सच्या संयुक्त सामरिक सरावाचे निरीक्षण केल्यानंतर सशस्त्र दलांना युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले. बुधवारी, स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले की किम यांनी सशस्त्र दलांना सर्वात महत्त्वाच्या कामासाठी – युद्धासाठी पूर्ण तयारी करण्यास सांगितले आहे.Kim Jong
योनहाप वृत्तसंस्थेने कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सी (केसीएनए) च्या हवाल्याने म्हटले आहे की, विशेष ऑपरेशन्सचा संयुक्त रणनीतिक सराव आणि टँक सबयुनिट्सद्वारे संयुक्त फायर स्ट्राइक प्रात्यक्षिक नुकतचे आयोजित करण्यात आले होते.
“आपल्या क्रांतिकारी सशस्त्र दलांमध्ये आता फक्त काही आघाड्यांचे प्रतिनिधित्व राहिलेले नाही तर त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे साम्राज्यवादविरोधी वर्ग आघाडीचा समावेश आहे आणि युद्धाची पूर्ण तयारी करणे हे सर्वात महत्त्वाचे काम आहे,” असे किम यांनी सांगितले.
माध्यमांनी प्रसारित केलेल्या फोटोंमध्ये उत्तर कोरियाचे सैनिक कॅमफ्लाज सूटमध्ये ड्रोन चालवताना दिसत आहेत. दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने यापूर्वी म्हटले होते की त्यांना असे संकेत मिळाले आहेत की रशियामध्ये तैनात असलेले उत्तर कोरियाचे सैन्य मॉस्कोकडून ड्रोन ऑपरेशन्स आणि रणनीती शिकत आहेत.
गेल्या महिन्यात, उत्तर कोरियाने पहिल्यांदाच कबूल केले की त्यांनी युक्रेनियन सैन्याविरुद्ध लढण्यासाठी रशियाला सैन्य पाठवले आहे. गेल्या आठवड्यात प्योंगयांगमधील रशियन दूतावासाला भेट देताना, किम म्हणाले की युद्धात उत्तर कोरियाचा सहभाग न्याय्य आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App