वृत्तसंस्था
न्यूयॉर्क : Khalistani Terrorist Pannu खलिस्तानी समर्थक संघटना शीख फॉर जस्टिस (SFJ) चा प्रमुख आणि भारताला हवा असलेला दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एक वादग्रस्त पत्र लिहिल्याचा दावा केला आहे. ३० जुलै रोजी पाठवलेल्या या पत्रात पन्नू यांनी भारतावर लादलेल्या २५ टक्के कर आकारणीचे समर्थन केले आहेच, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध कठोर भाषा देखील वापरली आहे.Khalistani Terrorist Pannu
पन्नूने स्वतःचा एक व्हिडिओही व्हायरल केला आहे, जो व्हाईट हाऊसबाहेर उभा असताना बनवला होता. यामध्ये तो अमेरिकेत ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांवर आधीच लादलेल्या २५% टॅरिफचे समर्थन करत आहे आणि ५००% टॅरिफची मागणीही करत आहे.Khalistani Terrorist Pannu
पन्नूने आपल्या पत्रात ट्रम्प यांच्या “अमेरिका फर्स्ट” धोरणाचे समर्थन केले आणि असा दावा केला की, भारतीय कंपन्या अमेरिकन तंत्रज्ञान, डेटा आणि नोकऱ्यांमध्ये घुसखोरी करत आहेत. त्यांनी आरोप केला की, मोदी सरकार जागतिक स्तरावर हिंदुत्व विचारसरणी पसरवण्यासाठी अमेरिकन कंपन्यांमध्ये भारतीय आउटसोर्सिंग एजन्सींचा वापर करत आहे. पन्नूने ट्रम्प यांना भारतातून अमेरिकन नोकऱ्या परत आणण्याची आणि तंत्रज्ञान क्षेत्रातून भारताला वगळण्याची मागणी केली.
पंतप्रधान मोदी आणि भारतावर गंभीर आरोप
पत्रात दहशतवादी पन्नूने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केला आहे की त्यांचे सरकार अमेरिकन बाजारपेठा “स्वस्त मेड इन इंडिया” उत्पादनांनी भरत आहे. ज्यामुळे अमेरिकन नोकऱ्या जात आहेत. पन्नूने दावा केला आहे की, या कंपन्या अमेरिकन डेटा चोरत आहेत आणि त्याचा वापर शीख कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांना लक्ष्य करण्यासाठी केला जात आहे.
५००% टॅरिफची मागणी
एवढेच नाही तर पन्नूने मोदी सरकारवर अमेरिकेत शिखांना मारण्याचा कट रचल्याचा, पुतिनच्या युद्धाला पाठिंबा देण्याचा आणि हिंदुत्ववादी दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोपही केला.
भारताला त्यांच्या कथित आक्रमकता आणि दडपशाही धोरणांची किंमत चुकवावी लागेल, म्हणून सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे मोदी सरकारवर ५००% कर लादण्यात यावा, असे गुरपतवंत पन्नू यांनी ट्रम्प यांना सुचवले.
पन्नू म्हणाले की, १७ ऑगस्ट रोजी हजारो अमेरिकन शीख खलिस्तान जनमत चाचणीत सहभागी होण्यासाठी वॉशिंग्टन डीसीमधील नॅशनल मॉलमध्ये जमतील. या दरम्यान, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नावाने विशेष अरदास (शीख प्रार्थना) देखील केली जाईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App