खलिस्तानी समर्थकांनी ब्रिस्बेनमधील भारतीय दूतावास बंद केला, हिंदूंविरोधात पोस्टर लावले


वृत्तसंस्था

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी देशातील भारतविरोधी घटकांना आळा घालण्याचे आश्वासन दिल्यानंतर खलिस्तान समर्थकांनी ब्रिस्बेनमधील भारतीय वाणिज्य दूतावास बंद करण्यास भाग पाडले. द ऑस्ट्रेलिया टुडेच्या वृत्तानुसार, ब्रिस्बेनच्या टारिंगा उपनगरातील स्वान रोडवरील भारतीय वाणिज्य दूतावासात अभद्र नारेबाजी केली आणि हिंदू वर्चस्ववादी असे पोस्टर्स झळकावले.Khalistani supporters shut down the Indian embassy in Brisbane, put up anti-Hindu posters

क्वीन्सलँड पोलिसांनी हा अनधिकृत जमाव असल्याचे सांगितले. हिंदू ह्युमन राइट्सच्या संचालक सारा एल गेट्स यांनी ऑस्ट्रेलिया टुडेला सांगितले की, शिख फॉर जस्टिसने त्यांना लक्ष्य केल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय वाणिज्य दूतावास आज बंद करणे भाग पडले. ते खलिस्तान जिंदाबादचे नारे देत असल्याचे गेट्स म्हणाले.



परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नुकतेच भारत दौऱ्यावर आलेले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियातील खलिस्तानी संघटनांनी निर्माण केलेल्या अशांततेबाबत चर्चा केली होती, ज्यामध्ये अल्बानीज यांनी शांतता राखण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते.

खलिस्तानींच्या निशाण्यावर भारतीय संस्था

ऑस्ट्रेलियातील भारतीय वाणिज्य दूत अर्चना सिंग यांना घटनास्थळावरून खलिस्तानी ध्वज सापडला. त्यांनी तत्काळ क्वीन्सलँड पोलिसांना माहिती दिली. अर्चना सिंह यांनी सांगितले की, आमचा पोलिस आणि अधिकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. आणखी एका पत्रकाराने सांगितले की, आतापर्यंत भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियन लोकांवर हल्ले होत होते, पण आता खलिस्तानी समर्थक भारत सरकारशी संबंधित संस्थांनाही लक्ष्य करत आहेत.

हिंदूंना घाबरवण्याचा प्रयत्न

काही दिवसांपूर्वी खलिस्तान्यांनी ब्रिस्बेनमधील एका हिंदू मंदिरालाही लक्ष्य केले होते. मार्चच्या सुरुवातीला खलिस्तान समर्थकांनी श्रीलक्ष्मी नारायण मंदिराची तोडफोड केली. ऑस्ट्रेलियातील हिंदूंना धमकावण्याचा हा प्रयत्न असल्याचे हिंदू मानवाधिकार संचालक सारा गेट्स यांनी स्पष्ट केले. हल्ल्यानंतर हिंदू समाजाच्या सदस्यांनी मंदिराच्या भिंतींवरून हिंदुविरोधी घोषणा काढून टाकल्या. गेट्स यांनी त्याचा एक फोटो ट्विट करून हिंदुस्थान झिंदाबाद असे लिहिले.

भारताने ऑस्ट्रेलियाला खलिस्तानी फुटीरतावाद्यांना लगाम घालण्यास सांगितले होते. क्वीन्सलँड पोलिसांनी सांगितले की, ते हा हल्ला गांभीर्याने घेत आहेत.

Khalistani supporters shut down the Indian embassy in Brisbane, put up anti-Hindu posters

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात