विशेष प्रतिनिधी
काठमांडू : Kathmandu नेपाळची राजधानी काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी तांत्रिक बिघाडामुळे सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे थांबवण्यात आली.Kathmandu
विमानतळाचे प्रवक्ते रिजी शेर्पा म्हणाले की, धावपट्टीवरील प्रकाश व्यवस्थेत समस्या होती. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ५:३० च्या सुमारास बिघाड झाल्याची नोंद करण्यात आली.Kathmandu
विमानतळ प्राधिकरणाने सांगितले की, तांत्रिक पथके घटनास्थळी पोहोचली आहेत आणि प्रकाश व्यवस्था दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. लवकरच उड्डाणे पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.Kathmandu
तांत्रिक बिघाडामुळे सुमारे ३५० उड्डाणांवर परिणाम झाला आहे, ज्यामध्ये २५० हून अधिक देशांतर्गत उड्डाणे आणि जवळपास १०० आंतरराष्ट्रीय उड्डाणे आहेत.
शनिवारी, दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरही अशीच समस्या आली, ज्यामुळे ८०० हून अधिक उड्डाणे प्रभावित झाली.
तीन विमाने वळवण्यात आली.
बिघाडामुळे दोन देशांतर्गत आणि तीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे इतर विमानतळांवर वळवण्यात आली. कतार एअरवेजचे एक विमान ढाका, कोरियन एअरचे एक विमान दिल्ली आणि फ्लाय दुबईचे एक विमान लखनौला वळवण्यात आले. बुद्ध एअरच्या दोन देशांतर्गत उड्डाणे नेपाळमधील इतर स्थानिक विमानतळांवर वळवण्यात आली.
एका कर्मचाऱ्याने माध्यमांना सांगितले की, धावपट्टीवरील प्रकाश व्यवस्था रात्रीच्या वेळी किंवा कमी दृश्यमानतेच्या वेळी वैमानिकांना विमान उतरवण्यास मदत करते. समस्येचे नेमके कारण समोर आलेले नाही, परंतु आज रात्रीपर्यंत ते दुरुस्त होण्याची अपेक्षा आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App