वृत्तसंस्था
मिलान : इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांचा “घटस्फोट” झाला आहे. 10 वर्षांच्या संसारानंतर मेलोनी यांनी आपल्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे.Italy PM Giorgia Meloni announces separation from partner after 10 years
माझे पती आंद्रे गिआनबर्नो यांच्याबरोबरचे माझे सहजीवन आता संपुष्टात येत आहे. 10 वर्षे आम्ही एकत्र राहिलो. एक उत्तम सहजीवन अनुभवले. आंद्रे यांनी मला माझ्या मुलीच्या रूपाने एक सुंदर उपहार दिला. पण आता इथून पुढे आमचे मार्ग वेगळे होत आहेत, अशा आशयाचे ट्विट जॉर्जिया मेलोनी यांनी केले आहे.
एका रिपोर्टनुसार 46 जॉर्जिया मेलोनी आणि आंद्रे गिआनबर्नो यांचा विवाह झालेला नाही, पण ते लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये एकत्र राहत होते त्यांना 7 वर्षांची मुलगी आहे. आंद्रे याच्याच बरोबरची मैत्री कायम राहील. मी त्याचे रक्षण करेन. माझ्या मुलीची ही जपणूक करेन. कारण आम्ही गेली 10 वर्षे खूप आनंदात होतो. आमचे मार्ग वेगळे झाले तरी हा आनंद इथून पुढे कायम राहावा अशी माझी इच्छा आहे, अशी पोस्ट मेलोनी यांनी सोशल मीडियावर लिहिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App