इस्त्रायलच्या लष्कराने हमासच्या हल्लेखोरांना चारही बाजूंनी घेरल्याचा दावा केला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास यांच्यात सलग २७ दिवसांपासून युद्ध सुरू आहे.७ ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांवी इस्रायलवर अचानक हल्ला केला. त्यानंतर इस्रायलने अधिकृतपणे युद्ध घोषित केले आणि त्यानंतर गाझामध्ये वेगवान हल्ला सुरू केला. इस्त्रायली सैन्याच्या हल्ल्यात आतापर्यंत पॅलेस्टाईनमधील सुमारे९ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. Israel Hamas War We will send your people back in bags Hamas threatens the Israeli army
इस्त्रायलच्या लष्कराने हमासच्या हल्लेखोरांना चारही बाजूंनी घेरल्याचा दावा केला आहे. दरम्यान, हमास प्रवक्त्याने इस्रायली लष्कराला धमकी दिली असून, ‘प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून आम्ही तुम्हाला परत पाठवू’, असे म्हटले आहे.
इस्रायलचे म्हणणे आहे की त्यांना हमासला नष्ट करण्याचे उद्दिष्ट अजून गाठायचे आहे आणि जोपर्यंत हे उद्दिष्ट साध्य होत नाही तोपर्यंत कोणतीही चर्चा होणार नाही. इस्रायली अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर गाझा संघर्ष शुक्रवारी २८ व्या दिवशी सुरू आहे. इस्रायलने पॅलेस्टिनी प्रदेशावर वारंवार बॉम्बफेक केली आहे आणि सैन्य पाठवले आहे.
हमास संचालित गाझामधील आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की ३७६० मुलांसह९०६१ लोक मारले गेले आहेत. इजिप्तच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, २१ जखमी पॅलेस्टिनी आणि ७२ मुलांसह ३४४ परदेशी नागरिक” इजिप्तमध्ये दाखल झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App