वृत्तसंस्था
कतार : इराणमध्ये हिजाबविरुद्ध सुरू असलेल्या विरोधाच्या आंदोलनाची आग ही कतार फुटबाॅल वर्ल्डकपमध्येही दिसली. सोमवारी इराण विरुद्ध इंग्लंड फुटबाॅल सामन्याच्या वेळी इराणचे खेळाडू मैदानावर पोहोचले. मात्र, यावेळी त्यांनी देशाचे राष्ट्रगीत म्हटले नाही. जोपर्यंत इराणचे राष्ट्रगीत वाजत होते, तोपर्यंत खेळाडूंच्या चेह-यावर कोणत्याही प्रकारच्या भावना दिसून आल्या नाहीत. भावनाहीन चेहरा घेऊन यावेळी सर्व खेळाडू मैदानावर उभे होते. इराणी खेळाडूंचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. iranian football players jump in the anti-hijab women’s movement
गप्प उभे होते 11 खेळाडू
इराण फुटबाॅल टीमचा कर्णधार अलीरेजा जहानबख्शने सामन्यापूर्वी सांगितले की, इराणमधील सरकारविरोधी निदर्शकांच्या बाजूने राष्ट्रगीत गाण्यास नकार द्यायचा की नाही हे टीममधील खेळाडू एकत्र येऊन ठरवतील. या विधानानंतर इराणची टीम खलीफा इंटरनॅशनल स्टेडियमवर उतरली. यावेळी आपल्या देशाचे राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर भावशून्य होऊन सर्व खेळाडू शांत उभे होते.
इराणी महिला महसा आमिनी हिच्या मृत्यूनंतर इराणमधील ही निदर्शने उग्र बनली आहेत. महसा आमिनी ही वायव्य इराणमधील साकेज शहरातील कुर्दिश महिला होती. तीन दिवस कोमात राहिल्यानंतर 16 सप्टेंबर रोजी तेहरानमधील रुग्णालयात तिचा मृत्यू झाला होता. ज्यावेळी इराण पोलिसांनी तिला अटक केली होती. आमिनीने ड्रेस कोडचे उल्लंघन केल्याचा आणि हिजाब घातला नसल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. साकेज येथे आमिनीची अंत्ययात्रा निघाली तेव्हा हजारो महिलांनी त्यांचे हिजाब फेकून सरकारविरोधी घोषणा दिल्या होत्या. अजूनही इराणमध्ये हिजाब विरोधी आंदोलने सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App