इराणने इराकमध्ये घुसून मोसादच्या गुप्तचर मुख्यालयावर डागले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र!

विशेष प्रतिनिधी

अरिबल : इराणने इराकची सीमा ओलांडून इस्रायलच्या गुप्तचर मुख्यालयावर क्षेपणास्त्र डागले. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनेच या हल्ल्याची माहिती दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गार्ड्सने सीरियामध्ये इस्लामिक स्टेटविरोधातही हल्ले केले आहेत. नुकताच इराणमध्ये बॉम्बस्फोट झाला होता, ज्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. इराणने इस्रायलवर या हल्ल्याचा आरोप केला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने मोसादच्या मुख्यालयावर हल्ला केला.Iran entered Iraq and fired a ballistic missile at Mossads intelligence headquarters



इराणी गार्ड्सने सांगितले की त्यांनी उत्तर इराकी शहर एरबिल जवळ इस्रायलच्या मोसाद एजन्सीवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. आयएस या दहशतवादी संघटनेची ठिकाणं उद्ध्वस्त करण्यासाठी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचाही वापर करण्यात आला.

सुरक्षा सूत्रांनी सांगितले की, एर्बिलच्या उत्तर-पूर्वेला सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या अमेरिकन दूतावास तसेच नागरी वस्त्यांपर्यंत स्फोटाचा आवाज ऐकू आला. क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे अमेरिकेच्या कोणत्याही सुविधांवर परिणाम झाला नसल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले.

मात्र, या हल्ल्याला इस्रायली अधिकाऱ्यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. तरी या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रवाशांना अरिबल विमानतळावरच थांबवण्यात आले आहे.

Iran entered Iraq and fired a ballistic missile at Mossads intelligence headquarters

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub