रशियाकडून भारताची तेल खरेदी : स्टुडिओत बसून खोटे नॅरेटिव्ह सेट करू नका; हरदीप सिंह पुरींनी सीएनएन अँकरला सुनावले

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : रशिया – युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचे वजन आपल्या पारड्यात पडावे यासाठी अमेरिका आणि युरोपीय देश जंग जंग पछाडत असताना भारताचे मोदी सरकार त्याला धूप घालत नाही, इतकेच नाही, तर जागतिक पातळीवर वेगवेगळे न्यूज चॅनेल्स जो भारत विरोधी नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यालाही मोदी सरकार वेळप्रसंगी चपराक हाणत आहे. याची सुरुवात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी करून दिली. त्यांच्या पाठोपाठ काही दिवसांमध्येच काल पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी देखील सीएनएनच्या अँकरला नॅरेटिव्ह सेटिंगच्या मुद्द्यावर सडेतोड उत्तर देऊन गप्प केले. India’s oil purchase from Russia: Don’t sit in the studio and set up a false narrative

हरदीप सिंह पुरी यांची काल सीएनएल न्यूज चॅनेल वर विशेष मुलाखत झाली. या मुलाखतीत अँकरने त्यांना रशियाकडून भारत तेल खरेदी करत आहे, या मुद्द्यावर घेरण्याचा प्रयत्न केला. परंतु हरदीप सिंह पुरी यांनी अशी सडेतोड उत्तरे दिली, की शेवटी अँकरला गप्प बसावे लागले. सीएनएनच्या अँकरने आपण फॅक्ट चेक करत आहोत, असे सांगून हरदीप सिंह पुरी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्याचा प्रयत्न केला. भारत रशियाकडून आपल्या गरजेच्या 2 % तेल खरेदी करतो. परंतु भारताची युरोपीय देशांनी आणि अमेरिकेने कोंडी केली, तर भारताकडे बॅकअप प्लॅन आहे का??, वगैरे प्रश्न विचारले. या प्रश्नांना हरदीप सिंह पुरी यांनी चपखल उत्तरे दिली. हरदीप सिंह पुरी म्हणाले मूळात स्टुडिओ मध्ये बसून नॅरेटिव्ह सेट करणाऱ्यांनी स्वतःच वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे.

व्यवस्थित फॅक्ट आणि आकडेवारी चेक केली पाहिजे. भारत रशियाकडून 2% नव्हे, 0.2 % तेल खरेदी करतो. भारताला गेल्या महिन्यात रशियाने नव्हे, तर इराकने सर्वाधिक तेल पुरविले आहे. भारताकडे बॅकअप प्लॅन काय आहे??, हे विचारण्याआधी भारत – रशिया, भारत – अमेरिका आणि युरोपीय देश आणि भारत यांचे संबंध कसे आहेत??, हे तुम्ही नीट तपासून घेतले पाहिजे. भारताचे सर्वांशी उत्तम संबंध आहेत. भारत जागतिक पातळीवरची पाचवी अर्थव्यवस्था आहे आणि ती वेगाने वाढते आहे. भारताला भारताची क्षमता पूर्ण माहिती आहे आणि आम्ही त्या दृष्टीनेच जागतिक सत्तांशी वाटाघाटी करत असतो. या वाटाघाटी पूर्णपणे खुल्या असतात. कोणताही दबाव भारतावर काम करू शकत नाही. सरकारवर कोणाचाही दबाव नाही आणि तो कोणी आणण्याची शक्यताही नाही. आणला तर भारत दबाव सहनही करणार नाही. कोणत्याही न्यूज चॅनलच्या स्टुडिओत बसून कुठलाही नॅरेटिव्ह सेट केला तरी त्यामुळे भारताला काही फरक पडत नाही. आम्ही आमच्या गतीनेच पुढे जात राहू, अशा परखड शब्दांमध्ये हरदीप सिंह पुरी यांनी सीएनएल अँकरला सुनावले.

काहीच दिवसांपूर्वी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी देखील एका मुलाखतीत असेच सुनावले होते. भारताला रशियाकडून तेल खरेदीला प्रतिबंध घालणाऱ्या देशांनी स्वतःकडे पहावे. विशेषतः युरोपीय देशांनी स्वतःकडे पाहावे. भारत संपूर्ण महिनाभरात जेवढे रशियाकडून तेल खरेदी करतो, तेवढे एका दुपारभरात युरोपीय देश रशियाकडून तेल खरेदी करतात हे आम्हाला पक्के माहिती आहे. त्यामुळे उगाच त्यांनी भारतीयांना शिकवण्याच्या फंदात पडू नये, अशा कडक शब्दांमध्ये जयशंकर यांनी या मुलाखतीत युरोपीय देश आणि न्यूज चॅनेलला सुनावले होते. त्याचीच आठवण हरदीप सिंह पुरी यांनी देखील सीएनएनच्या कालच्या मुलाखतीत परखड शब्दात करून दिली.

India’s oil purchase from Russia: Don’t sit in the studio and set up a false narrative

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात