पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी खार यांच्या खोट्या आरोपांना भारताचे सडेतोड प्रत्युत्तर
विशेष प्रतिनिधी
काश्मीरच्या मुद्य्यावरून पुन्हा एकदा यूएनएचआरसी मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं. तसेच, दहशतवाद आणि अल्पसंख्यांकावरील अत्याचारावरूनही जोरदार टीका केली आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषध(UNHRC) मध्ये पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी खार यांनी पुन्हा एकदा भारतावर खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केला. ज्याला भारताकडून सडतोड उत्तर देण्यात आले. भारताच्या प्रतिनिधी सीमा पुजानी यांनी पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्य्यावरून खडसावले आणि अगोदर स्वत:चा देश सांभाळा असे म्हणत आरसा दाखवला. India slams Pakistan on issues of religious minorities, terrorism, at UNHRC
सीमा पुजानी यांनी म्हटले की, पाकिस्तानमध्ये आज कोणताही धार्मिक अल्पसंख्याक स्वंतत्रपणे राहू शकत नाही किंवा आपल्या धर्माचं पालन करू शकत नाही. जगभरातील हजारो नागरिकांच्या मृत्यूला पाकिस्तानची धोरणं थेट जबाबदार आहेत. मागील एक दशकात बेपत्ता झालेल्यांप्रकऱणी पाकिस्तानच्या चौकशी आय़ोगाकडे ८ हजारांहून जास्त तक्रारी दाखल झाल्या आहेत. बलुच लोकांनी या क्रूर नीतीचा फटका सोसला आहे. विद्यार्थी, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक आणि समुदायांच्या नेत्यांना नियमितपणे गायब केलं जात आहे.
#WATCH | "No religious minority can freely live or practice its religion in Pakistan today…Pakistan's policies are directly responsible for the death of thousands of civilians around the world": India slams Pakistan on issues of religious minorities, terrorism, at UNHRC (03.03) https://t.co/1PlPckPdah pic.twitter.com/t88CMHAfU6 — ANI (@ANI) March 3, 2023
#WATCH | "No religious minority can freely live or practice its religion in Pakistan today…Pakistan's policies are directly responsible for the death of thousands of civilians around the world": India slams Pakistan on issues of religious minorities, terrorism, at UNHRC (03.03) https://t.co/1PlPckPdah pic.twitter.com/t88CMHAfU6
— ANI (@ANI) March 3, 2023
काश्मीरच्या मुद्य्यावरूनही भारताने पाकिस्तानाला चांगलंच फटकारलं. पुजानी यांनी म्हटले की, जम्मू-काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेशांचा संपूर्ण परिसर भारताचा भाग होता, आहे आणि नेहमीच राहील. शेजारील देश नेहमीच भारताविरोधात अपप्रचार करण्यात गुंतलेला आहे. हे पाकिस्तानच्या चुकीच्या प्राधान्यक्रमाचे संकेत आहे. पाकिस्तान भारतीय क्षेत्रावर अवैधरित्या ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App