वृत्तसंस्था
इस्लामाबाद : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालाचा भारताने चुकीचा अर्थ लावला, असा कांगावा शनिवारी पाकिस्तानने केला. India misinterprets decision in Kulbhushan Jadhav case; Pakistan said
कुलभूषण जाधव यांना हेरगिरी करत असल्याच्या आरोपावरून पाकिस्तानने काही वर्षांपूर्वी अटक केली होती. तसेच खटला चालवून फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्या विरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर न्यायालयाने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार आवश्यक असलेल्या सर्व बंधनांचे पालन करण्याची तयारी असल्याचेही पाकिस्तानने म्हटले आहे. जाधव प्रकरणाचा फेरआढावा घेण्यासाठी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये जे विधेयक मांडलेल्या त्रुटी आहेत. त्या प्रथम दूर करण्यासाठी पावले उचलावीत, असे गुरुवारी भारताने पाकिस्तानला बजावले होते.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती द्यावी, असा निकाल दिला आहे. त्यानुसार फेरविचार करण्यासाठी यंत्रणा प्रस्तावित कायद्याने निर्माण होत नाही, असे भारताने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App