विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : हॉलीवूड आणि बॉलीवूडमधून पाकिस्तानी चित्रपट सृष्टीतही अश्लिलता आली आहे. मात्र, पाकिस्तानी चित्रकर्मींनी हे टाळून आपल्या संस्कृतीला प्रोत्साहन देणारे चित्रपट बनवावेत असे आवाहन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे.Imran Khan accuses Bollywood of increasing vulgarity in Pakistani cinema
पाकिस्तान चित्रपटसृष्टीच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना इम्रान खान म्हणाले, चित्रकर्मींनी अभिनव पध्दतीने विचार करताना आपल्या स्वत:चा आशय निर्माण करावा. हॉलीवूडमध्ये सुरू झालेली अश्लिलता बॉलीवूडच्या मार्गाने पाकिस्तानात आली आहे. ही संस्कृती आता येथे विकसित होऊ लागली आहे.
पाकिस्तानातील अनेक टीव्ही शो भारतातही लोकप्रिय आहेत. या डॉन या दैनिकाच्या वृत्ताचा हवाला देऊन ते म्हणाले, आपल्या मातीतील आशय निर्माण करणे गरजेचे आहे.इम्रान खान यांनी यापूर्वीही चित्रपटांतील अश्लिलतेविरुध्द वक्तव्य केले होते. पाकिस्तानात लैंगिक हिंसा वाढण्याचे कारण म्हणजे वाढती अश्लिलता आहे,असे त्यांनी म्हटले होते.
या कार्यक्रमात त्यांनी महिलांच्या तोकड्या कपड्यांवरही वक्तव्य केले होते. महिलांनी तोकडे कपडे घातले तर पुरुषांवर परिणाम होणारच. कारण पुरुष म्हणजे काही रोबोट नाही असे त्यांनी म्हटले होते. इम्रान खान यांच्या या वक्तव्यावर प्रचंड टीकाही झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App