वृत्तसंस्था
इस्लामाबाद : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पाकिस्तानला कर्जाचा नवीन भाग देण्याऐवजी सुधारणा करण्याचा सल्ला दिला आहे. IMFच्या व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टालिना जॉर्जिएवा यांनी म्हटले आहे की, सर्वप्रथम पाकिस्तानला एका देशाप्रमाणे वागायला शिकावे लागेल. त्या म्हणाल्या की, पाकिस्तान एक अशी धोकादायक जागा बनत आहे जिथे व्यवस्था फक्त कर्जाच्या जोरावर चालते.IMF Slams Pakistan Managing Director Says – Learn to behave like a country, take money from us and give benefits to the rich
IMF चीफ पुढे म्हणाल्या- प्रश्न असा आहे की IMF तुम्हाला कर्ज देते, पण तुम्ही ते गरिबांच्या कल्याणाऐवजी अशा प्रकारे वापरता की त्याचा फायदा देशातील श्रीमंतांना होतो.
पाकिस्तानवर सध्या 100 अब्ज डॉलरचे कर्ज
महागाईचा दर 40 टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. सरकारकडे केवळ 2.7 अब्ज डॉलर्सच्या विदेशी ठेवी आहेत. चीनने अलीकडेच पाकिस्तानला आणखी 700 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज दिले आहे. पण, एका महिन्याचा खर्चही भागवणे अवघड झाले आहे.
IMF चे लक्ष दोन गोष्टींवर
‘ग्रीक सिटी टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत IMF प्रमुख म्हणाल्या की, आम्ही पाकिस्तानला सुरुवातीला दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास सांगत आहोत. पहिला- कर संकलन वाढवा. तेथे केवळ काही लाख लोकच कर भरतात आणि त्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे हे आश्चर्यकारक आहे. दुसरे- अनुदान प्रणाली बदला. तुम्ही IMF कडून पैसे घेतात आणि श्रीमंतांना त्याचा फायदा होतो. प्रत्यक्षात गरज असलेल्या गरिबांपर्यंत काहीही पोहोचत नाही.
कुणाला दिला इशारा?
IMFच्या मॅनेजिंग डायरेक्टरनी पाकिस्तानचे लष्कर आणि गुप्तचर संस्था आयएसआयचे नाव घेतले नाही, परंतु इशाऱ्यामध्ये एका मीडिया रिपोर्टचा हवाला दिला. म्हणाल्या- अत्यंत गरीब देशाला बजेटच्या 20% कसे मिळते. नोकरशहा आणि इतर अधिकारी निवृत्तीनंतरही लाखो रुपये कमावतात. स्पष्ट आहे की, तुमची सिस्टिम काम करत नाही.
नुकतेच IMFच्या अहवालात असे म्हटले होते की, यावर्षी पाकिस्तानला 27 अब्ज डॉलरचे कर्ज फेडायचे आहे. हे अशक्य दिसते, कारण त्यांच्याकडे 2 अब्ज डॉलर्सही नाहीत. IMF ने 1.2 बिलियनचा हप्ता जारी केला तरीही काहीही होणार नाही. तेवढेच त्यांचे आयात बिल आहे.
याच अहवालात म्हटले आहे- 22 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशात करदात्यांची संख्या केवळ 30 लाख आहे हे आश्चर्यकारक आहे. हे लोक प्रचंड करचोरीही करतात.
18 जणांच्या बँकांमध्ये 4 हजार अब्ज रुपये
पाकिस्तानातील सर्वात मोठा राजकीय आणि धार्मिक पक्ष जमियत-ए-इस्लामीचे प्रमुख सिराज-उल-हक यांच्या मते, देशातील 18 लोकांच्या बँकांमध्ये 4 हजार अब्ज रुपये जमा आहेत. या लोकांच्या नावांची संपूर्ण यादी आपल्याकडे असल्याचा दावा हक यांनी केला. पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असून हे लोक हवे असल्यास देशाला दिवाळखोरीपासून वाचवू शकतात, असेही ते म्हणाले. सिराज हे इम्रान खान यांच्या जवळचे मानले जातात.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App