‘’पाकिस्तानने जर मोदींच्या राजवटीत भारताला चिथावलं तर…’’ अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात दावा

भारत आणि चीन यांच्यातील संबंधांवरही अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात चर्चा करण्यात आली आहे

प्रतिनिधी

अमेरिकेच्या एका गुप्त अहवालानुसार पंतप्रधान मोदींच्या गुप्त अहवालानुसार जर पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भारताल चिथावल्यास भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं. यूएस इंटेलिजिन्स कम्युनिटी रिपोर्टचे वार्षिक धोक्यांच्या मूल्यांकनात असे नमूद करण्यात आले आहे की, भारतविरोधी दहशतवादी संघटनांचे समर्थन करण्याचा पाकिस्तानचा मोठा इतिहास राहिलेला आहे. या रिपोर्टनुसार पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारती सैन्याकडून प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता अधिक वर्तवण्यात आली आहे.If Pakistan provokes India under Modis regime US intelligence report claims

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की,”वाढलेल्या तणावाची प्रत्येक बाजूची धारणा संघर्षाचा धोका वाढवते आणि काश्मीरमधील हिंसक अशांतता किंवा भारतात दहशतवादी हल्ले हे संभाव्य कारणीभूत मुद्दे आहेत,” असे अहवालात म्हटले आहे. काश्‍मीरचा मुद्दा आणि पाकिस्तानकडून होणार्‍या सीमेपलीकडील दहशतवादावरून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अनेकदा तणावाचे राहिले आहेत. दोन अण्वस्त्रधारी देशांमधील वाढत्या संघर्षामुळे भारत-पाकिस्तान वादाचे संकट विशेष चिंतेची बाब आहे, असे अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात नमूद करण्यात आले आहे.


नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिल्याने JDU ने राज्य कार्यकारिणीवर केली ‘ही’ मोठी कारवाई


 

“२०२१ च्या सुरुवातीला दोन्ही बाजूंनी नियंत्रण रेषेवर पुन्हा युद्धविराम सुरू केल्यानंतर नवी दिल्ली आणि इस्लामाबाद त्यांचे संबंध मजबूत करतील,” असे अहवालात म्हटले आहे. अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात भारत आणि चीन यांच्यातील संबंधांवरही चर्चा करण्यात आली आहे. या अहवालानुसार, भारत आणि चीन यांच्यात द्विपक्षीय सीमा चर्चा झाली आणि सीमेवरील अनेक ठिकाणचा तणाव निवळला. पण २०२० मध्ये झालेल्या हिंसक संघर्षामुळे दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण राहणार आहेत. अहवालात म्हटले आहे की विवादित जागेवर दोन्ही देशांनी सैन्य तैनात केल्यामुळे सीमा विवादासंदर्भात दोन अणुशक्तींमध्ये सशस्त्र धोका वाढतो. याशिवाय त्यात म्हटले आहे की भूतकाळातील घडामोडी दर्शवितात की एलएसीवर वारंवार होणाऱ्या छोट्या चकमकी मोठ्या स्वरुपात वाढू शकतात.

पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांशी भारताचे संबंध सुरळीत नाहीत. २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचे संबंध खालावले आहेत. तर २०२० मध्ये गलवानमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर चीनचे संबंध बिघडले आहेत.

If Pakistan provokes India under Modis regime US intelligence report claims

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात