भारतामध्ये सध्या समान नागरी कायद्याची चर्चा सुरू आहे. यामध्ये मुस्लिम धर्मीयांना चार लग्न करायची आणि चार बायका ठेवण्याच्या हक्काची चर्चा होते. मात्र, याच कारणाने एका प्रसिध्द गायकाला मुस्लिम धर्माने आकर्षित केले आहे. I want to have four wives, so I want to convert to Islam
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतामध्ये सध्या समान नागरी कायद्याची चर्चा सुरू आहे. यामध्ये मुस्लिम धर्मीयांना चार लग्न करायची आणि चार बायका ठेवण्याच्या हक्काची चर्चा होते. मात्र, याच कारणाने एका प्रसिध्द गायकाला मुस्लिम धर्माने आकर्षित केले आहे.
युगांडामधला लोकप्रिय गायक वायक्लिफ तुगुमे ऊर्फ यकी बेंडा याला इस्लाम धर्म स्वीकारण्याची इच्छा आहे. उच्चशिक्षित असलेल्या तुगुमेनं स्थानिक माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की इस्लाम धर्म तुम्हाला चार स्त्रियांशी विवाह करण्याची परवानगी देतो. त्यामुळे मला हा धर्म खूप आवडतो.
लोकप्रिय गायक वायक्लिफ तुगुमे ऊर्फ यकी बेंडा हा एका मुलाचा पिता आहे आणि त्याचे महिलांसोबतचे संबंध सतत बिघडत असतात. त्यामुळेच तो इस्लाम धर्म स्वीकारण्याचा विचार करत आहे. यकीव्यतिरिक्त असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आहे. यकी हा केमिकल इंजिनीअर आहे. केमिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यानं नोकरी करण्याऐवजी संगीतकार बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं आणि संगीत क्षेत्रात करिअर केले.
इस्लाम धर्मात एकाच व्यक्तीशी विवाह झालेल्या सर्व बायका भांडण न करता एकत्र राहतात, हे पाहून मला खूप आश्चर्य वाटतं. हे कोणत्याही धर्मात क्वचितच पाहायला मिळतं,ै असं यकीनं सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App