विशेष प्रतिनिधी
अंकारा – तुर्कस्तानातील दक्षिण जंगलात वणवा पेटला असून त्याची धग आता शहरापर्यंत पोचली आहे. सुमारे ६० ठिकाणी आगीच्या घटना घडल्या असून आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.Huge fire in Turkestan
या आगीमुळे जंगलातील वनसंपत्तीचे मात्र फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच जंगलातील प्राणीही मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडले आहेत.आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.
तुर्कस्तानचे कृषी आणि वन मंत्री बेकिर पाकडेमीर्ली यांनी बुधवारी आणि गुरुवारी जंगलात आगीच्या ५३ घटना घडल्याचे सांगितले. बहुतांश आगीवर नियंत्रण मिळवले असून तुर्कस्तानच्या अंतल्या भागात तीन जण मृत्युमुखी पडल्याचे
ते म्हणाले. त्यात ८२ वर्षाच्या एका व्यक्तीचा समावेश आहे. आगीमुळे जंगल परिसरातील २० गावांना रिकामे करण्यात आले तर आगीने भाजलेल्या ५० जणांना दवाखान्यात दाखल केले आहे. लेबनानमध्येही आग लागली असून त्यात एका मुलाचा मृत्यू झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App