विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : हिंदू मुलींकडे लांडग्याच्या नजरेने पाहणाºया एकाने पाकिस्तानात हिंदू मुलीची भर चौकात गोळ्या घालून आत्महत्या केली. पूजा ओद असे या अठरा वर्षांच्या मुलीचे नाव आहे. हल्लखोराने तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केल्याने त्याने तिची गोळ्या घालून हत्या केली.Hindu girl murdered in Pakistan
पाकिस्तानातील मुलींचे सक्तीने धर्मांतर करण्यासाठी त्यांना पळवून नेले जाते. त्यांच्याशी निकाह लावला जातो. यामुळे येथील हिंदू धशस्तावलेले आहेत. मानवी हक्क कार्यकर्त्या नायला इनायत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानात शेकडो ख्रिश्चन्स आणि हिंदू मुलींचे दरवर्षी इस्लाममध्ये सक्तीने धर्मांतर केले जाते.
अल्पसंख्य समाजातील महिलांचे अपहरण करून सक्तीने धर्मांतर केले जाते. सक्तीचे विवाह आणि धर्मांतराला देशातील अल्पसंख्य समाज हा पूवीर्पासून तोंड देत आहे, असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. हक्कांसाठी लढणाऱ्या अनेक संघटनांनी पाकिस्तान सरकार हिंदू आणि इतर अल्पसंख्य समाजाबद्दल वाढत चाललेल्या गुन्ह्यांवर आवश्यक कारवाई करीत नाही, असा आरोप केला आहे.
तत्पूर्वी, सिंधमधील प्रांतीय सरकारने सक्तीचे धर्मांतर आणि विवाह बेकायदा ठरवण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, धर्माच्या आधारे निदर्शने करणाऱ्यांनी मुली या मुस्लीम पुरुषांच्या प्रेमात पडल्यावरच धर्मांतर करतात, असे म्हणून विधेयकाला आक्षेप घेतला होता. पाकिस्तानमध्ये हिंदूंची लोकसंख्या १.६० टक्के आणि सिंधमध्ये ६.५१ टक्के आहे, असे पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App