विशेष प्रतिनिधी
काठमांडू – नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे दहा दिवसांपासून बंद असलेले रस्ते आता हळहळू मोकळे होत आहेत. त्यामुळे भारताचे ठिकठिकाणी अडकलेले सुमारे ८५६ मालट्रक परतीच्या मार्गावर आहेत. भूस्खलनामुळे रस्ते बंद झाल्याने भारत-नेपाळ सीमेवरील सौनोली येथे मालट्रकच्या दहा ते बारा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. Heavy rain in Nepal
भूस्खलनामुळे रस्त्यात अडकून पडलेले ८५६ मालट्रक बाहेर काढण्यात आले असून ते बिहार, राजस्तान, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चि म बंगाल, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगण, हरियाना, पंजाब आणि जम्मू काश्मीपरला रवाना केले आहेत. रस्ते खराब असल्याने मालट्रकची वाहतूक संथ झाली आहे. त्यामुळे काही तासांच्या प्रवासाला चोवीस तास लागत आहेत. सोनोली ते नौतनवा टोल नाक्यांपर्यंत सुमारे १२ किलोमीटरचा जाम झाला आहे.
राजधानी काठमांडूत मुसळधार पावसामुळे पूर आला असून ३८० हून अधिक घरांत पाणी शिरले आहे. सखल भागात पाणी साचल्याचे पोलिसांनी सांगितले. नेपाळ पोलीस, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळच्या सैनिकांनी काल रात्री १३८ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App