वृत्तसंस्था
काबूल – अफगाणिस्तानात तालिबानची सरकार बनविण्याची मशक्कत चालू असताना हक्कानी नेटवर्क आणि तालिबान यांच्यातच जोरदार हिंसक संघर्ष उडाला आहे. एवढेच नाही, हा संघर्ष एवढा पेटला की हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात तालिबानचा म्होरक्या मुल्ला अब्दुल गनी बरदार हा जखमी झाला आहे.Haqqani Network for Seizure of Power in Kabul – Violent Conflict between the Taliban; Taliban leader Mullah Abdul Gani Baradar was injured in the firing
त्याला पाकिस्तानात हलविण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. हाच मुल्ला अब्दुल गनी बरादर हा तालिबान सरकारचा प्रमुख बनणार होता. तालिबान्यांना अफगाणिस्तानात सरकार बनविण्यासाठी मदत करण्याच्या नावाखाली पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद सध्या अफगाणिस्तानात आहेत.
ते कथित स्वरूपात तालिबानला सरकार बनविण्यात मदत करीत आहेत. पण पाकिस्तानच्या या कथित मदतीतूनच हक्कानी नेटवर्क आणि तालिबान यांच्यात सत्तेसाठी हिंसक संघर्ष उडाल्याचे बोलले जात आहे.
हक्कानी नेटवर्क आणि तालिबान यांच्यातली ही सगळी लढाई काबूलमधली सत्ता काबीज करण्यासाठी सुरू असून तालिबान आणि हक्कानी नेटवर्क या दोन्ही गटांना सत्तेमध्ये प्रमुख वाटा हवा आहे. कारण काबूल जिंकल्याचा दोन्ही गटांचा दावा आहे.
हक्कानी नेटवर्कला अफगाणिस्तानात मध्ययुगातली राजवट आणायची आहे. तर तालिबानला या राजवटीत काही आधुनिक व्यवस्था देखील तयार करायची आहे. यातून हा संघर्ष उडाल्याचे सांगण्यात येत आहे.
अफगाणिस्तानातील तालिबान सरकारमध्ये तिथल्या अल्पसंख्याक समूदायाला सामील करण्यास तो अनुकूल होता. पण हक्कानी नेटवर्कचा त्याच्या या सूचनेला विरोध असल्याचे सांगण्यात येते. यातूनच गोळीबार झाला आणि त्यात मुल्ला अब्दुल गनी बरादर हा जखमी झाल्याचे सांगण्यात येते आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App