इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली पुष्टी ; हमासकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
विशेष प्रतिनिधी
जेरुसलेम: Yahya Sinwar इस्रायल आणि पॅलेस्टिनी संघटना हमास यांच्यात गेल्या वर्षभरापासून युद्ध सुरू आहे. इस्रायलने गाझा पट्टीतील हमासच्या लक्ष्यांवर हल्ले तीव्र केले आहेत. गुरुवारी, इस्रायली सैन्याने उत्तर गाझामधील हमासच्या स्थानांवर हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवारचा ( Yahya Sinwar ) मृत्यू झाला आहे. इस्रायलचे परराष्ट्र मंत्री कॅट्झ यांनी सिनवारच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. मात्र, याबाबत हमासकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.Yahya Sinwar
जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार, इस्रायली लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गुरुवारी गाझा पट्टीतील हमासच्या स्थानांवर हवाई हल्ला करण्यात आला. या हवाई हल्ल्यात हमासचा प्रमुख याह्या सिनवारही मारला गेला असण्याची दाट शक्यता आहे.
3 हमास सैनिकांचे मृतदेह सापडले आहेत. यापैकी एक मृतदेह याह्या सिनवारचा असू शकतो. यानंतर इस्रायली लष्कराने नमुने घेऊन ते डीएनए चाचणीसाठी पाठवले. आता इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सिनवार यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App