Generation Z explosion in Nepal: नेपाळात जनरेशन Z चा स्फोट: बलेंन शाह आणि सुधान गुरूंग यांच्या नेतृत्वाखाली ओली सरकारचा पाडाव

Generation Z explosion in Nepal:

विशेष प्रतिनिधी

काठमांडू : Generation Z explosion in Nepal नेपाळच्या राजकारणात इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर युवक रस्त्यावर उतरले आणि अवघ्या काही दिवसांत देशाचे राजकीय समीकरण पालटले. पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि राष्ट्रपती रामचंद्र पौडेल या दोघांनी जनआंदोलनासमोर झुकून राजीनामा दिला. या नाट्यमय घडामोडींच्या केंद्रस्थानी दोन चेहरे झळकत आहेत: काठमांडूचे महापौर बलेंन शाह आणि ‘हामी नेपाळ’ या संस्थेचे संस्थापक सुधान गुरूंग.Generation Z explosion in Nepal

7 सप्टेंबर 2025 रोजी बलेंन शाह यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी स्पष्ट लिहिलं, “उद्या जमणारं हे आंदोलन हे GenZ चे आहे. यात कोणताही राजकीय पक्ष किंवा नेते नसतील. ही तरुणाई स्वतःच्या विचारांनी रस्त्यावर उतरणार आहे. मी स्वतः हजर राहू शकत नाही, पण पूर्ण पाठिंबा देतो.”



ही पोस्ट क्षणार्धात व्हायरल झाली आणि दुसऱ्या दिवशी 13 ते 28 वयोगटातील हजारो युवकांनी काठमांडूसह पोखरा, बिराटनगर, ललितपूर, भक्तपूरसह सात प्रमुख शहरांत रस्त्यावर मोर्चे काढले. सुरुवातीला हे आंदोलन सोशल मीडियावरील बंदीविरोधात होतं, मात्र भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई आणि ओली सरकारच्या हुकूमशाहीविरुद्ध ते मोठ्या जनचळवळीत बदललं.

8 सप्टेंबरच्या रात्री आंदोलन हिंसक झाले. सरकारी इमारतींना आग लावण्यात आली, अनेक ठिकाणी पोलिसांशी चकमकी झाल्या. सरकारी आकडेवारीनुसार 19 जणांचा मृत्यू झाला, तर 300 पेक्षा अधिक युवक जखमी झाले. काठमांडूच्या रस्त्यांवर सैन्य उतरवावं लागलं.

9 सप्टेंबरला पंतप्रधान ओली आणि राष्ट्रपती पौडेल या दोघांनीही राजीनामा दिला. ओली सरकार गेल्यानंतर देशात अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. आंदोलनकर्त्यांनी बलेंन शाह यांना अंतरिम पंतप्रधान बनवण्याची मागणी केली असून त्यांच्या फेसबुक पेजवर “We want you as PM” असे हजारो संदेश भरले आहेत.

बलेंन शाह: रॅपर ते महापौर

बलेंन शाह यांचा प्रवास अत्यंत वेगळा आहे. व्यावसायिकदृष्ट्या ते स्ट्रक्चरल इंजिनियर असून त्यांची खरी ओळख एक लोकप्रिय रॅपर म्हणून झाली.त्यांच्या गीतांमध्ये भ्रष्टाचार, राजकीय अपयश आणि शासकांच्या लाचारीवर कठोर टीका असायची. 2022 मध्ये त्यांनी स्वतंत्र उमेदवार म्हणून काठमांडू महापौरपदाची निवडणूक जिंकली. Time Magazine ने 2023 मध्ये त्यांना “Top 100 Influential People” मध्ये स्थान दिलं होतं. अमेरिकन दूतावासाशी त्यांच्या वारंवार भेटी झाल्या असून 2024 मध्ये त्यांना अधिकृत भेटीचं आमंत्रणही मिळालं. युवक त्यांना नव्या विचारांचा नेता मानतात. मात्र शाह यांनी आंदोलनकर्त्यांना नंतर आवाहन केलं: “देश तुमच्या हातात आहे. सार्वजनिक संपत्ती नष्ट करू नका, घरी परत जा.”

सुधान गुरूंग: नागरिक संघटनांचा चेहरा

सुधान गुरूंग हे सध्या 36-38 वर्षांचे असून ‘हामी नेपाळ’ या संस्थेचे संस्थापक आहेत. 2015 च्या भूकंपानंतर त्यांनी आपत्तीग्रस्तांसाठी मदतकार्य सुरू केलं आणि तेव्हापासून ही संस्था युवकांचं व्यासपीठ बनली. सोशल मीडिया, इंस्टाग्राम आणि डिस्कॉर्डसारख्या माध्यमांतून त्यांनी आंदोलनाचं नियोजन केलं. त्यांनी आंदोलनकर्त्यांना शाळेचा गणवेश परिधान करायला, पुस्तकं हातात घ्यायला आणि शांततेचं भान ठेवायला सांगितलं. त्यांचा “नेपो किड्स विरोधी अभियान” तरुणांमध्ये लोकप्रिय झाला, ज्यात त्यांनी नातेसंबंधांच्या राजकारणाला थेट आव्हान दिलं.

नेपाळातील या आंदोलनाकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठं लक्ष वेधलं गेलं. आशियातील इतर देशांतील विद्यार्थी संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

ओली सरकारच्या पतनानंतर नेपाळ आता नव्या नेतृत्वाच्या प्रतीक्षेत आहे. पारंपरिक राजकीय पक्षांवर जनतेचा विश्वास उडाल्याने नवीन पिढी स्वतःचा नेता शोधत आहे. बलेंन शाह हे त्यांच्यासाठी करिश्माई पर्याय म्हणून उदयास आले आहेत, तर सुधान गुरूंग हे संघटनात्मक ताकदीचे प्रतीक ठरले आहेत.

नेपाळातील या जनरेशन Z चळवळीने केवळ एक सरकार पाडलं नाही, तर दक्षिण आशियात तरुणाईचं नवं युग सुरू केलं आहे. शाह आणि गुरूंग हे या नव्या अध्यायाचे प्रतीक ठरत आहेत. देशाचा पुढचा प्रवास कसा असेल, याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.

Generation Z explosion in Nepal: Oli government overthrown under the leadership of Balen Shah and Sudhan Gurung

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात