वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये 11 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (ECP) गुरुवारी 2 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली. मात्र, या निवडणुका ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि नोव्हेंबरच्या दरम्यान व्हायला हव्या होत्या.General Elections in Pakistan on February 11; Information of the Election Commission of Pakistan to the Supreme Court
निवडणूक पुढे ढकलण्यामागे इसीपीने परिसीमन कारण सांगितले आहे. त्यांच्या मते, जनगणना आणि परिसीमन यामुळे जानेवारीतही निवडणुका घेणे अवघड आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात 11 तारखेला ही निवडणूक घेण्यात येणार आहे. त्याचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही.
1 नोव्हेंबर रोजी काळजीवाहू पंतप्रधान अन्वर-उल-हक काकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते की, कोणालाही निवडणूक लढवण्यास प्रतिबंध नाही. तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाचा ते उल्लेख करत होते.
ECPचे वकील सजील स्वाती यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले – सीमांकनाचे काम वेगाने सुरू आहे आणि ते 30 जानेवारीपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. याशिवाय तोपर्यंत उर्वरित तयारीही पूर्ण करू. निवडणुका घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे आम्ही 11 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे.
ईसीपीच्या वकिलाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने आपापसात सल्लामसलत केली आणि नंतर म्हटले – मुख्य निवडणूक आयुक्तांना राष्ट्रपतींकडे पाठवा, जेणेकरून तेही त्यांच्याकडून सल्ला घेऊ शकतील. मग ठोस उत्तरासह आमच्याकडे परत या. आज संध्याकाळी उशिरा या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.
चार वर्षांनंतर नवाझ शरीफ देशात परतले याचा अर्थ त्यांनी लष्करासोबत शांतता प्रस्थापित केली आहे, असे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले होते. इम्रानच्या पक्षाला निवडणूक लढवण्यापासून रोखले जाईल आणि नवाझचा पक्ष पीएमएल-एन विजयी होईल, असाही अर्थ काढला जात होता. यासाठी 2018 मध्ये पीटीआयसाठी तीच पद्धत अवलंबली जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App