रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केले एस. जयशंकर यांच्या हजरजबाबीपणाचे कौतुक; भारताच्या तेल खरेदीवर जशास तसे उत्तर

वृत्तसंस्था

मॉस्को : रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लॅव्हरोव्ह यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस​​​​​. जयशंकर यांचे कौतुक केले आहे. रशियन शहरातील सोची येथे झालेल्या जागतिक युवा मंचात युक्रेन युद्धादरम्यान भारत रशियाकडून तेल का खरेदी करत आहे, असा प्रश्न लॅव्हरोव्ह यांना विचारण्यात आला. यावर लॅव्हरोव्ह म्हणाले- माझे मित्र जयशंकर यांनी याचे उत्तर चांगले दिले होते.Foreign Minister of Russia Praises FM S Jaishankar; Answer on India’s oil purchase

यानंतर लॅवरोव्ह यांनी UN मध्ये जयशंकर यांच्या वक्तव्याची आठवण करून दिली आणि म्हणाले – असाच प्रश्न भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना UN मध्ये विचारण्यात आला होता. तेव्हा जयशंकर यांनी त्यांना आपल्या कामाशी काम ठेवण्याचा सल्ला दिला होता. पाश्चात्य देश रशियन फेडरेशनकडून किती तेल विकत घेत आहेत, याचीही आठवण त्यांना करून देण्यात आली.



भारतासोबतच्या संबंधांबद्दल बोलताना लॅव्हरोव्ह म्हणाले- रशिया आणि भारत हे नेहमीच चांगले मित्र राहिले आहेत. शीतयुद्धाच्या काळात पाश्चिमात्य देशांनी भारताला शस्त्रपुरवठा बंद केला तेव्हा मॉस्कोने भारताला पाठिंबा दिला. रशियाने भारतासोबत ब्राह्मोस या हायटेक क्षेपणास्त्राचे संयुक्त उत्पादन सुरू केले आहे.

खरे तर रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पाश्चात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले होते. अशा परिस्थितीत युरोपने तेल खरेदीसाठी मध्यपूर्वेचा सहारा घेतला होता. मात्र, यादरम्यान भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली. याला काही पाश्चिमात्य देशांनी विरोधही केला होता.

भारत रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करतो

भारताने 2020 मध्ये रशियाकडून आवश्यक असलेल्या कच्च्या तेलाच्या फक्त 2% खरेदी केली. रशिया-युक्रेन युद्ध सुरू होण्यापूर्वी 2021 मध्ये एकूण पुरवठा 16% आणि 2022 मध्ये 35% पर्यंत वाढला. सध्या भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेच्या 40 टक्के रशियाकडून खरेदी करत आहे.

2023 मध्ये जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान, भारताने रशियाकडून प्रति टन ₹ 43,782 या दराने तेल खरेदी केले आहे (यामध्ये शिपिंग आणि इतर शुल्क समाविष्ट आहेत). वृत्तसंस्था रॉयटर्सने सरकारी आकडेवारीचा हवाला देत ही माहिती दिली आहे.

Foreign Minister of Russia Praises FM S Jaishankar; Answer on India’s oil purchase

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात