विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट लागू झाल्यापासून तेथील लोकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. उपासमार, भूकबळी, कोलमडलेली आर्थिक व्यवस्था, बंद पडलेले उद्योग आणि व्यापार यामुळे तेथील लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. लहान मुलांमधील मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर मानवतेच्या धर्माखाली भारताने अफगाणिस्तानला अन्नधान्याचा पुरवठा आणि औषधं पुरवण्याचे ठरवले आहे.
Food and medicine aid to Afghanistan via Islamabad in Pakistan, Pakistan put conditions
पण यामध्ये एक अडचण होती की, हा पुरवठा करण्यासाठी वाघा बॉर्डर पासून पाकिस्तानातील इस्लामाबाद मार्गे करावा लागणार आहे. 7 ऑक्टोबर रोजी भारताने यासंबंधी प्रस्ताव मांडला होता. 24 नोव्हेंबरला पाकिस्तानने या संबधी संमती दर्शवली होती. पण आता पाकिस्तानने यासाठी दोन अटी घातलेल्या आहेत.
पहिली अट अशी की, भारतातून येणारा अन्नधान्याचा पुरवठा आणि औषधे हे पाकिस्तानी ट्रक्समधूनच अफगाणिस्तानमध्ये जातील. जेव्हा की भारताचे असे म्हणणे आहे की, अफगाणिस्तानच्या ट्रक्समधून हा माल अफगाणिस्तानमध्ये पोहोचविला जावा. कारण याआधी देखील अफगाणिस्तानच्या ट्रकमधूनच बराचसा माल अफगाणिस्तानमध्ये पोहोचवला जायचा. पाकिस्तानने दुसरी कंडिशन अशी ठेवली आहे की, जितका साठा जाईल त्याच्यावर टॅक्स देखील भरावा लागेल. तर भारताने मानवतेच्या धर्मातून केल्या जाणाऱ्या मदतीवर कोणता टॅक्स आम्ही का द्यावा? हा प्रश्न उपस्थित केला आहे.
Afghanistan Crisis: भारताकडून NSA स्तरावरील बैठक-चीनचा नकार; ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा
संयुक्त राष्ट्र संघटनेने यामध्ये आता मध्यस्थी करून लवकरात लवकर मार्ग काढण्याचा निर्णय घेतला आहे. कारण अफगान मधील लोकांना या मदतीची लवकरात लवकर गरज आहे. लवकरच हिवाळा सुरू होत आहे त्यामुळे भारताकडूनच मदत लवकरात लवकर पोहोचवली जावी असा आग्रह धरण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App