विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय राजकीय डावपेचात कॅनडियन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो किती कच्चे आणि अपरिपक्व आहेत, हे त्यांच्या भारताबरोबरच्या राजकीय वर्तणूकीतून सिद्ध झाले. खलिस्तानी दहशतवादी हरदीप निज्जर याच्या हत्येचा भारतावर ठपका ठेवल्यानंतर भारताने जस्टिनला जे प्रत्युत्तर दिले, ते कोणत्याही थप्पडीपेक्षा कमी नव्हते. कॅनडाचे तब्बल 55 मुत्सद्दी भारताने हाकलून दिले, पण तरी कॅनडाचे पंतप्रधान सुधारले नाहीत. त्यांनी भारतावर ठपका ठेवणे थांबविले नाही. त्यानंतरही भारताने त्यांना पुन्हा थप्पड हाणली. पण त्या पाठोपाठ आता जस्टिन हे इस्रायलला शिकवणी द्यायला गेले आणि इस्रायलच्या पंतप्रधानांकडूनही थप्पड खाऊन आले.
खलिस्तान दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणामध्ये भारताशी पंगा घेणाऱ्या कॅनडाने आता इस्रायलला अक्कल शिकवण्याचा प्रयत्न केला. हमास आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या संघर्षादरम्यान गाझामधील मृताच्या आकडेवारीचा संदर्भ देत या मृत्यूंसाठी इस्रायल जबाबदार असल्याचे कॅनडियन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी म्हटले. मात्र या विधानानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना ट्रूडो यांना सुनावलं आहे. गाझा पट्टीमध्ये केलेल्या कारवाईचे नेतन्याहू यांनी जोरदार समर्थन केले.
हमास आणि इस्रायलमध्ये युद्धाला 40 दिवस पूर्ण झाले असून युद्ध अजूनही सुरू असतानाच ट्रूडो यांनी इस्रायलवर निशाणा साधला. गाझा पट्टीमध्ये महिला आणि मुलांच्या हत्या बंद झाल्या पाहिजे. यावर उत्तर देताना बेंजामिन नेतन्याहू यांनी, गाझामध्ये सर्वसामान्य नागरिकांना इस्रायल नाही तर हमास लक्ष्य करत आहे, असे प्रत्युत्तर दिले.
ट्रूडो काय म्हणाले होते?
कॅनडियन पंतप्रधानांनी इस्रायल सरकारने अधिक संयम बाळगण्याचं आवाहन केलं होतं. जग टीव्ही आणि सोशल मीडियावर सर्व काही पाहत आहे. डॉक्टर, वाचलेले लोक, पालक गमावलेली मुलांच्या प्रतिक्रिया आपण ऐखत आहोत, असं ट्रूडो म्हणाले होते. पश्चिमेकडील ब्रिटीश कोलंबिया येथे एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ट्रूडो यांनी महिला, लहान मुलं आणि बालकांची हत्या संपूर्ण जग बघत आहे. हे थांबवायला हवं. हमासने पॅलेस्टाईनच्या नागरिकांना मानवी ढाल बनवून हल्ले करणं थांबवलं पाहिजे आणि सर्व ओलीस लोकांना सोडलं पाहिजे, असं ट्रूडो यांनी म्हटलं होतं.
बेंजामिन नेतन्याहू यांचं उत्तर
बेंजामिन नेतन्याहू यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन म्हणजेच ट्वीटरवरुन एक पोस्ट केली आहे. “मुद्दाम नागरिकांवर हल्ले इस्रायल करत नसून हमासच करत आहे. हमासने नरसंहारामध्ये यहूदींवर झालेल्या सर्वात भयानक हल्ल्यामध्ये नागरिकांची डोकी छाटली. अनेकांना जाळून मारलं आणि नरसंहार घडवून आणला. इस्रायल सर्वसामान्यांना होणाऱ्या नुकसानापासून दूर ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे हमास त्यांना नुकसान पोहचवण्यासाठी सर्व ते प्रयत्न करत आहेत,” असं बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे.
– हमासच हल्ले करतोय!!
इस्रायलने गाझामधील नागरिकांना सुरक्षित बाहेर पडता यावं म्हणून सेफ पॅजेस तयार केले आहे. तर दुसरीकडे हमास बंदुकीचा धाक दाखवून नागरिकांना बाहेर जाण्यापासून रोखण्याचं काम हमास करत असल्याचा दावा इस्रायलने केला आहे. या युद्ध अपराधासाठी हमासला जबाबदार ठरवलं पाहिजे, इस्रायलला नाही, असंही बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे. सामान्य नागरिकांमध्ये मिसळून हमासच्या दहशतवादीच हल्ला करत आहेत. जगातील सर्व सभ्य देशांनी हमासच्या या हिंसाचाराला थांबवण्यासाठी इस्रायलचं समर्थन केले असल्याची बेंजामिन नेतन्याहू यांनी जस्टिन ट्रुडो यांना आठवण करून दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App