नायजेरियात भीषण बोट दुर्घटना, 103 ठार, 97 बेपत्ता, 100 जणांना वाचवले, बोटीवर होते 300 जण

वृत्तसंस्था

नायजर : नायजेरियातील क्वारा येथे सोमवारी पहाटे नायजर नदीत एक बोट बुडाली. या अपघातात 103 जणांचा मृत्यू झाला, तर 97 जण पाण्यात बुडाले. त्याच वेळी, 100 लोकांना वाचवण्यात यश आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बोटीमध्ये 300 लोक होते. सर्वजण लग्न समारंभातून परतत होते.Fatal boat accident in Nigeria, 103 dead, 97 missing, 100 rescued, 300 on board

पोलिसांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. बेपत्ता लोकांचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.



झाडाला धडकल्यानंतर बोट उलटली

सीएनएनच्या रिपोर्टनुसार, स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, गावात काही लोक बोटीतून लग्नासाठी गेले होते. यादरम्यान मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. अशा परिस्थितीत लग्नातील काही पाहुण्यांनी गाव सोडण्यासाठी बोटीने नदी पार करण्याचे ठरवले.

त्यांनी सांगितले की, दुसऱ्या बाजूने किनाऱ्याकडे येत असताना त्यांची बोट पाण्यात बुडालेल्या झाडाच्या खोडावर आदळली आणि तुटली. यानंतर तिचे दोन तुकडे झाले आणि ती पाण्यात बुडाली.

मे महिन्यातही बोट उलटून 15 जणांचा मृत्यू

यापूर्वी मे महिन्यात नायजेरियातील सोकोटो येथे बोट उलटून 15 जणांचा मृत्यू झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नायजेरियातील अशा भागांमध्ये बोटींचे अपघात सामान्य आहेत. कारण इथले लोक सहसा ये-जा करण्यासाठी स्वनिर्मित बोटी वापरतात.

Fatal boat accident in Nigeria, 103 dead, 97 missing, 100 rescued, 300 on board

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात