विशेष प्रतिनिधी
कराची : गॅसगळतीमुळे पाकिस्तानमधील कराची येथे सलग दोन स्फोट झाले आहेत. एकूण 14 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. अनेक लोक जखमी आहेत. तर बरेच लोक ढिगाऱ्याखाली अजूनही अडकलेले आहेत. पोलिस आणि रेंजर्स टीमच्या साहाय्याने बचाव कार्य सुरू आहे.
Explosion due to gas leak in Karachi! 14 died
कराचीमधील शेरशाह भागातील पराचा चौकाजवळ दुपारी 1.30 वाजता ही घटना घडली. या घटनेमध्ये स्फोटाच्या जागी जवळच असणारी एका खाजगी बँकेची इमारत देखील कोसळली आहे. दोन स्फोट काही अंतराने झाले. पहिला स्फोट झाल्यानंतर बचावकार्य सुरू असतानाच दुसरा स्फोट झाला. पण याची तीव्रता पहिल्याच स्फोटापेक्षा कमी होती.
रशियात विद्यार्थ्याने केला स्वतःस स्फोटाने मारण्याचा प्रयत्न
स्फोटात पडलेली इमारत ही बेकायदेशीर रित्या बांधण्यात आली होती. असे डीआयजी खराल यांनी सांगितले आहे. नाला साफ करण्यासाठी अनेक वेळा बँकेला इमारत खाली करण्याची नोटीस देखील देण्यात आली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App