Abbas Port : इराणच्या अब्बास पोर्टवर स्फोट, 5 जणांचा मृत्यू; 700 हून अधिक जखमी

Abbas Port

वृत्तसंस्था

तेहरान : Abbas Port शनिवारी इराणच्या अब्बास पोर्टवर झालेल्या स्फोटात 5 जणांचा मृत्यू झाला आणि 700 हून अधिक जण जखमी झाले. माध्यमांच्या वृत्तानुसार, घटनास्थळी ज्वलनशील पदार्थांच्या साठवणुकीत निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.Abbas Port

इराणी अधिकाऱ्यांनी सांगितले की, अब्बास पोर्टच्या बाहेर, शाहिद राजाई बंदराच्या सिना कंटेनर यार्डमध्ये हा स्फोट झाला. येथे तेल आणि इतर पेट्रोकेमिकल सुविधांसह वाहतूक कंटेनर साठवले जातात.

बचाव कर्मचारी घटनास्थळावरून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. इराणी माध्यमांचे म्हणणे आहे की, स्फोटामुळे कोणत्याही ऊर्जा पायाभूत सुविधांचे नुकसान झाले नाही.



आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे इराणला आवश्यक उपकरणे मिळू शकत नाहीत, म्हणूनच येथे वारंवार औद्योगिक अपघात होतात.

तेहरानपासून १००० किमी अंतरावर आहे अब्बास पोर्ट

स्फोटानंतर नॅशनल इराणी पेट्रोलियम रिफायनिंग अँड डिस्ट्रिब्युशन कंपनीने एक निवेदन जारी केले की, परिसरातील तेल सुविधांवर स्फोटाचा कोणताही परिणाम झाला नाही. हे बंदर इराणची राजधानी तेहरानपासून १००० किमी अंतरावर आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये बंदराच्या आतून धुराचे लोट बाहेर पडताना दिसत आहेत. लोक घाबरून इकडे तिकडे धावताना दिसले आणि अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले.

२०२० मध्ये या पोर्टच्या संगणक प्रणालीवर सायबर हल्ला झाला होता.

मे २०२० मध्ये, इराणने इस्रायलवर बंदरावर मोठा सायबर हल्ला केल्याचा आरोप केला, ज्यामुळे त्यांची संगणक प्रणाली क्रॅश झाली. यामुळे परिसरात अनेक दिवसांपासून गोंधळाचे वातावरण होते.

हा स्फोट अशा वेळी झाला आहे, जेव्हा इराणी अधिकारी नवीन अणु कराराबाबत अमेरिकन अधिकाऱ्यांशी वाटाघाटी करत आहेत.

Explosion at Iran’s Abbas Port, 5 killed; over 700 injured

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात