वृत्तसंस्था
लंडन : European युरोपीय संघटनेने(ईयू) आपल्या ४५ कोटी नागरिकांसाठी इशारा जारी केला आहे. त्यात नमूद केले की, युद्ध, सायबर हल्ले, हवामान बदल आणि महामारीच्या वाढत्या धोक्यामुळे अन्न, पाणी आणि अन्य आवश्यक सामग्रीचा कमीत कमी ७२ तासांसाठी साठा करावा. हा निर्देश युक्रेन-रशिया युद्ध, कोरोना महामारी आणि ऊर्जा संकटासारख्या अलीकडच्या घटनांमुळे दिला आहे.European
नाटो प्रमुख मार्क रूटे यांच्यानुसार, २०३० पर्यंत रशिया युरोपवर हल्ला करण्याच्या स्थितीत होऊ शकतो.ईयूच्या ॲडव्हायजरीत लोकांना टॉर्च, आयडी पेपर, औषध, रोकड आणि शॉर्टव्हेव रेडिओसारख्या वस्तूंचा साठा करण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय ईयूने आपल्या २७ देशांतून प्रारंभिक अलर्ट सिस्टिम, रणनीतीक रिझर्व्ह आणि आपत्ती व्यवस्थापन तंत्र बळकट करण्याची योजना बनवण्याचा आदेश दिला आहे.
युक्रेन युद्धावर चर्चेसाठी ३० देशांचे नेते एकत्र
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ३० हून जास्त देशांचे नेते, नाटो आणि युरोपीय संघाचे प्रमुख गुरुवारी एकत्र आले. या बैठकीत युक्रेनला अधिक लष्करी मदत देण्यावर चर्चा झाली. बैठकीत फ्रान्स आणि ब्रिटनने एक विशेष आघाडी बनवण्याचा प्रस्ताव दिला. त्याचा उद्देश युरोपला भविष्यात रशियाच्या कोणत्याही हल्ल्यापासून वाचवणे आहे. बैठकीत युक्रेनी अध्यक्ष झेलेन्स्की, ब्रिटनचे पीएम स्टार्मर, फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन, जॉर्जियाचे पीएम मेलोनी व अन्य सहभागी होते
मॅक्रॉन म्हणाले, युरोपीय सैनिकांची युक्रेनमध्ये तैनाती शक्य
बैठकीनंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी घोषणा केली की, युरोपीय सैनिकांना युक्रेनमध्ये तैनात केले जाऊ शकते. हे सैनिक युक्रेनमधील प्रमुख शहरे आणि रणनीतीक ठिकाणांवर तैनात होतील. हे पुढील आघाडीवर तैनात होणार नाहीत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App