आतापर्यंत १६०० हून अधिक लोकांचा मृत्यू
विशेष प्रतिनिधी
Myanmar म्यानमारपासून बँकॉकपर्यंत भूकंपामुळे हाहाकार माजला आहे. भूकंपामुळे अनेक उंच इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या. हाय-टेक व्यवस्था निरुपयोगी ठरल्या आहेत. भूकंपाचा धोका अद्याप टळलेला नाही. कारण, म्यानमारमध्ये गेल्या २४ तासांत १५ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.Myanmar
ही म्यानमारमधील आतापर्यंतची सर्वात मोठी दुर्घटना आहे. गेल्या २४ तासांत दर दुसऱ्या तासाला भूकंपाचे धक्के जाणवले. म्यानमारमध्ये इंटरनेट सेवा बंद पडल्या आहेत. या नैसर्गिक आपत्तीनंतर समोर येत असलेले सर्व व्हिडिओ आणि फोटो लोकांच्या मनात अधिकच भीती निर्माण करत आहे. म्यानमार आणि बँकॉकमधील अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. यामध्ये म्यानमारचा एकेकाळी अभिमान असलेला अवा पूल देखील समाविष्ट आहे. हा पूल १९३४ मध्ये बांधण्यात आला होता.
स्थानिकांसाठी अवा ब्रिज हा इतिहास होता, अनेक पिढ्यांच्या आठवणी जपून ठेवत होता. भूकंपामुळे म्यानमारचे पॅगोडा मंदिरही कोसळले. युनेस्कोच्या जागतिक वारशात समाविष्ट असलेले हे मंदिर खूपच सुंदर होते. वर्षभर तिथे भाविकांचा ओघ सतत चालू असे. पण आता मंदिराभोवती फक्त भग्नावशेषाचे दृश्य आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App