विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Donald Trump भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामावर आपल्याच विधानाला पूर्ण विरोध करत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता नवा पवित्रा घेतला आहे. यापूर्वी युद्धविरामाचे श्रेय स्वतःकडे घेतलेल्या ट्रम्प यांनी आता स्पष्ट केलं आहे की, “मी मध्यस्थी केली असं मी म्हणालो नव्हतो, मी फक्त परिस्थिती निवळवण्यासाठी मदत केली.”Donald Trump
ट्रम्प पुढे म्हणाले की, “भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शत्रुत्व वाढत होतं. आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. गेल्या आठवड्यात दोन्ही देशांमधील वातावरण अतिशय तणावपूर्ण होतं. क्षेपणास्त्रांची देवाणघेवाण सुरू झाली होती. अशा स्थितीत आम्ही हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली. हे खूप कठीण होतं आणि परिस्थिती खरोखर नियंत्रणाबाहेर जात होती.”
१० मे रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविरामाची घोषणा झाली होती. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याचे श्रेय स्वतःला दिले होते. त्यांनी लिहिले होते – “भारत आणि पाकिस्तानने तात्काळ युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे हे जाहीर करताना आनंद होत आहे.”
मात्र, ट्रम्प यांचा हा दावा भारताने तात्काळ फेटाळून लावला. भारत सरकारने स्पष्ट केलं की, युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसोबत कुठल्याही प्रकारची मध्यस्थी किंवा व्यापारावर चर्चा झालेली नाही. अमेरिकेच्या भूमिकेचा आदर असूनही, हा निर्णय दोन्ही देशांनी स्वतंत्रपणे घेतल्याचं भारताने स्पष्टपणे सांगितलं.
व्यापारासंदर्भातील आपल्या भूमिकेबाबत मात्र ट्रम्प ठाम राहिले. “मी व्यापाराबद्दल बोललो आणि तेव्हाच सगळं मिटलं,” असंही त्यांनी सांगितलं. मात्र भारताने पुन्हा एकदा या चर्चेचा व्यापाराशी काहीही संबंध नसल्याचं अधोरेखित केलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App