डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि रशिया यांना चीनच्या खोल आणि अंधाऱ्या गर्तेत “गमावले” की “ढकलले”??

Donald Trump

भारताबरोबर टेरिफ युद्ध सुरू केलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या ट्रूथ सोशल मीडिया अकाउंट वर सत्य बोलले, पण ते अर्धसत्य ठरले!! 5 सप्टेंबर रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ अकाउंट वर अमेरिकेने भारत आणि रशिया यांना चीनच्या खोल आणि अंधाऱ्या गर्तेतत गमावले. त्यांचे संबंध तिथे तरी दीर्घकाळ चांगले राहोत, असे लिहिले.Donald Trump “lose” or “push” India and Russia into the deep and dark abyss of China

ट्रम्प यांनी या लिखाणातून सत्य सांगितल्याचा दावा केला, पण ते अर्धसत्य ठरले. अमेरिकेने भारत आणि रशिया यांना चीनच्या खोल आणि अंधाऱ्या गर्तेत “गमावले” नाही, तर स्वतःहून “ढकलले.” हे करताना त्यांनी रशिया आणि भारत यांच्या हिताचा किंवा इच्छेचा कुठलाही विचार केला नाही खरंतर त्यांनी अमेरिकेच्या दीर्घकालीन हिताचाही नीट विचार केला नाही. केवळ गेल्या काही दिवसांमधल्या विशिष्ट घटनांमुळे ट्रम्प चिडले आणि त्यांनी भारताबरोबर दीर्घकालीन राजकीय आणि व्यापारी वैर पत्करले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या युद्धामध्ये भारताने अमेरिकेच्या पाकिस्तान मध्ये गुप्तपणे ठेवलेल्या अण्वस्त्रांना धक्का लावल्याचे एक निमित्त ठरले. पण त्या पलीकडे जाऊन आपण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबविल्याला भारताने मान्यता दिली नाही म्हणून आपल्याला नोबेल पुरस्कार मिळणार नाही, असा स्वतःचा परस्पर गैरसमज करून घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी रोजच्या रोज संजय राऊत यांच्यासारख्या पत्रकार परिषदा घेऊन भारतावर एकतर्फी ज्यादा टेरिफ लादले.



त्याचा परिणाम म्हणून भारत अमेरिकेपासून दूर गेला आणि स्वहिताचा विचार करून रशियाच्या सूचनेनुसार SCO समिटमध्ये सामील झाला. त्यामध्ये स्वतःच्या नैसर्गिक शक्तीनुसार भूमिका निभावली.

पण अमेरिकेने त्याच्याही आधी युक्रेन विरुद्ध रशिया या युद्धात अकारण NATO ची प्रतिष्ठा पणाला लावत केवळ युरोपियन शक्तींच्या नादी लागून रशिया विरुद्ध पंगा घेतला. युक्रेन मधल्या मिनरल्स व्यापारात काही वाटा मिळण्यापलीकडे अमेरिकेला रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्धाचा काही फायदा झाला नाही. उलट अमेरिकेची कधी नव्हे, एवढी प्रतिमा हानी झाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या रोजच्या बडबडीचा भारताला जसा वैताग आला तसाच वैताग रशियाला देखील आला. त्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध जसे बिघडले, तसे रशिया आणि अमेरिका यांच्यातली ही संबंध केवळ अतिरिक्त बडबड केल्यामुळे बिघडले.

ट्रम्प यांचे अर्धसत्य

या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि रशिया यांना एक प्रकारे डिवचणारे, पण “अर्धसत्य” असे truth लिहिले. यातला अर्धसत्य भाग असा की, चीन हा देश खोल आणि अंधारी गर्ता आहे. म्हणजेच (China deep and dark) आहे, असे ट्रम्प यांनी लिहिले. पण हे सांगायला ट्रम्प यांनी तसे लिहिण्याची गरज नव्हती कारण चीन कसा वर्चस्ववादी आणि विश्वासघातकी देश आहे, हे भारताला अन्य कुठल्याही देशापेक्षा अधिक माहिती आहे आणि त्याचा अनुभव आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी चीनला “खोल आणि अंधारी गर्ता” म्हणून भारताला जणू काही इशारा दिला असा आव आणला, तरी तो अर्धसत्य आहे. त्याचबरोबर चीनच्या “खोल आणि अंधाऱ्या गर्तेत” अमेरिकेने भारताला “गमावलेले” नाही, तर ट्रम्प प्रशासनाने स्वतःहून “ढकलले” आहे. कारण ट्रम्प प्रशासनाने भारताच्या मैत्रीची योग्य ती किंमत ठेवली नाही म्हणून भारताने स्वहित जपून चीनबरोबर विशिष्ट अंतर राखून SCO मध्ये मैत्रीचा हात पुढे केला. पण ही वस्तुस्थिती ट्रम्प यांनी आपल्या truth अकाउंट वर लिहिली नाही.

 रशियन आणि भारतीय नेतृत्वाची परिपक्वता

ट्रम्प यांनी केवळ भारतालाच यातून डिवचले असे नाही, तर रशियाला देखील टोचले. काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी रशिया हा देश चीनचा मंडलिक राष्ट्र बनला आहे, असा “जावईशोध” लावला होता. चीन रशियाचा अमेरिकेविरुद्ध वापर करून घेतोय आणि रशिया तसा वापर करून देतोय, असा दावाही त्यांनी केला होता. ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना परराष्ट्र धोरण शिकवायचा प्रयत्न केला होता. पण पुतिन ट्रम्प यांच्या शिकवणीला बधले नाहीत. त्यांनी रशिया आणि चीन यांच्यातील दीर्घकालीन मैत्री बाधित होऊ दिली नाही.

उलट त्याच दरम्यान त्यांनी भारतीय नेतृत्वाला SCO मध्ये सामील होण्याचे महत्त्व आपल्या परीने सांगितले भारत + चीन आणि रशिया equal partners राहतील असे आश्वासन दिले. भारताला रशियाचा असलेला अनुकूल अनुभव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विशिष्ट विश्वास ठेवून SCO समिटमध्ये भाग घेतला. पण ते चीनच्या कह्यात गेले नाहीत. ते चीनच्या व्हिक्टरी परेडला उपस्थित राहिले नाहीत. चीन ही खोल आणि अंधारी गर्ता आहे, हे ट्रम्प यांच्यापेक्षा भारतीय नेतृत्वाला अधिक माहिती आहे. त्यामुळे चीन बरोबर संबंध राहताना हातचे राखून वावरले पाहिजे याची पक्की जाणीव भारतीय नेतृत्वाला आहे. त्यासाठी ट्रम्पच्या सल्ल्याची भारताला गरज नाही.

त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी truth अकाउंट वर काहीही लिहिले असले तरी ते अर्धसत्य आहे आणि भारत आणि रशिया यांच्या हिताचे बिलकुल नाही.

Donald Trump “lose” or “push” India and Russia into the deep and dark abyss of China

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात