विशेष प्रतिनिधी
सिडने : तुम्हाला इतक्या लाखाची लॉटरी लागली आहे असे फोन किंवा ई-मेल आल्यावर त्याकडे फेक म्हणून दूर्लक्ष केले जाते. परंतु, प्रत्येकच वेळी असे कॉल फेक नसतात याचा अनुभव ऑस्ट्रेलियातील एका महिलेला आला. तिने जवळपास ५४ लाख रुपयांचा जॅकपॉट जिंकला परंतु ही रक्कम घेण्यासाठी लॉटरी कंपनीकडून आलेल्या फोन कॉलकडे स्कॅम असल्याचे समजून दूर्लक्ष केले.Despite winning Rs 54 lakh, the woman ignored the lottery company’s phone
न्यू साउथ वेल्स येथील महिलेने 25 फेब्रुवारीच्या लकी लॉटरी ड्रॉइंगसाठी तिकीट खरेदी केले होते. लॉटरी लागली का हे पाहण्यास ती विसरली. लॉटरी कंपनीचे लोक तिला वारंवार संपर्क साधत होते. परंतु, कोणा स्कॅमरचा फोन आहे. आपली फसवणूक होईल म्हणून तिने त्यांच्या कॉलकडे दूर्लक्ष केले.
कंपनीने या महिलेला ई-मेलद्वारेही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याकडेही तिने पाहिले नाही. त्यानंतर एके दिवशी सहज तिने ऑनलाईन लॉटरी खात्यात लॉग इन केले. त्यावेळी तिला समजले की आपल्याला ५४ लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. तिने तातडीने ही गोष्ट पतीला सांगितली. दोघेही वारंवार तपासून बघत होते. कारण त्यांचा विश्वासच बसत नव्हता.
शेवटी त्यांनी लॉटरी कंपनीशी संपर्क साधला. त्यांनी ही रक्कम लवकरच खात्यात जमा करण्याचे आश्वासन या महिलेला दिले आहे. आता ही रक्कम कशी खर्च करायची या विचारात ही महिला आहे. ही महिला सुमारे दहा वर्षांपासून लॉटरी काढत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App