विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : मी अमेरिकन नागरिक आहे पण भारत माझ्या मुळांमध्ये आहे. आमध्ये खोलपर्यंत भारत आहे. माझ्यामध्ये भारतीयत्व खूप मोठ्या प्रमाणात आहे असे गूगल आणि अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी सांगितले. गेल्या महिन्यात भारतातील कोरोनामुळे झालेले मृत्यू पाहून डोळ्यात अश्रू आले होते असेही त्यांनी सांगितले.Despite being an American citizen, he is deeply Indian, said Google CEO Sundar Pichai.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तामीळनाडूमध्ये जन्मलेले आणि आयआयटी खडगपूर येथे शिकलेले पिचाई यांना शेवटचे कधी रडलात विचारले तेव्हा ते म्हणाले, गेल्या वर्षभरात कोरोनामुळे झालेले मृत्यू पाहून मी रडलो होते. गेल्या महिन्यात भारतात कोरोनाने माजविलेला उद्रेक पाहिल्यावर डोळ्यात अश्रू आले होते.
जगातील सर्वात मोठ्या कंपनीचे सीईओ असलेल्या पिचाई यांनी आपल्यालाही कोणाचा मत्सर वाटतो हे सांगितले. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या बहुप्रतिक्षित अवकाश उड्डाणांबद्दल मला हवा वाटू लागला आहे.
मी आता त्यांचा मत्सर करू लागला आहे. कारण मलाही अंतराळातून पक्षी पाहायला आवडतील.कृत्रिम बुध्दीमत्तेच्या प्रश्नावर बोलतानाा पिचाई म्हणाले, मानवता आजपर्यंत झाली नाही ऐवढी विकसित होईल आणि कार्य करेल असे हे गहन तंत्रज्ञान आह. आपल्याला वाटते त्यापेक्षा अधिक प्रगल्भ आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App