विशेष प्रतिनिधी
जिनेव्हा – गेल्या दीड वर्षांपासून जगभरात हाहा:कार माजविणाऱ्या कोरोना संसर्गाची साथ आटोक्यात येत असल्याचे चिन्हे दिसत आहेत. विशेषत: भारतात नवीन रुग्ण आढळून येण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण घसरल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.Corona decreasing all over the world says WHO
भारतात ११ ते १७ ऑक्टोबरदरम्यान दररोज कोरोनाचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १८ टक्क्यांनी तर मृत्यू होण्याच्या संख्येत १३ टक्क्यांनी घट झाली आहे.भारतात कोरोनामुळे गेल्या आठवड्यात एकूण १५३५ जणांचा मृत्यू झाला.
ही संख्या गेल्या आठवड्याच्या तुलनेत १३ टक्क्यांनी कमी आहे. जगभरात आत्तापर्यंत २४ कोटींहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून त्यात ४९ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.
युरोप वगळता जगातील अन्य भागात नवीन रुग्णांची संख्या कमी होत असल्याचेही आरोग्य संघटनेने म्हटले आहे. यासंदर्भातील अहवालात म्हटले की, ११ ते १७ ऑक्टोबर या काळात कोरोनाचे जगभरात २७ लाखांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळले तर ४६ हजाराहून अधिक बाधितांचा मृत्यू झाला.
युरोप वगळता जगातील प्रत्येक भागात रुग्णसंख्या कमी झालेली दिसते. युरोपीय भागात गेल्या आठवड्याच्या तुलनेत नवीन रुग्ण आढळून येण्याच्या प्रमाणात ७ टक्के वाढ झाली. आफ्रिकी क्षेत्रात नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १८ टक्क्यांनी घसरले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App