वृत्तसंस्था
बिजिंग : चीनमधील सर्वात वयोवृद्ध महिला अलीमिहान सेयती यांचे 135 व्या वर्षी निधन झाले. अलीमिहान यांनी एक दोन नाही तर तीन शतके पाहिली. स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त दिले. चीनच्या प्रसिद्धी विभागानुसार काशगर प्रांतात शुले काऊंटीच्या कोमक्सरिक टाऊनशिपमध्ये त्या राहत होत्या . त्यांचा जन्म 25 जून 1886 मध्ये झाला होता. China’s Oldest Person: Abbab witnessed three centuries! China’s oldest woman dies at 135
चीनची वृत्तसंस्था शिन्हुआनुसार 2013 मध्ये ‘चाइना एसोसिएशन ऑफ गेरोंटोलॉजी अँड जेरियाट्रिक्स’ ने जारी केलेल्या यादीनुसार अलीमिहानचे नाव सर्वात वर होते. गुरुवारी त्यांचे निधन झाले. मृत्यूपर्यंत त्यांचे आयुष्य नेहमीसारखे होते, वेळेवर जेवणे, अंगनात सूर्यप्रकाश घेणे आदी कामे त्या करत होत्या.
चीनमध्ये कोमस्करिक हे असे शहर आहे ज्या शहरात सर्वाधिक 90 वर्षांवरील लोक राहतात. या शहरात सरकारद्वारे 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना डॉक्टर सेवा, वार्षिक शारीरिक तपासणी आणि मासिक सबसिडी आदी दिली जाते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App