विशेष प्रतिनिधी
बिजींग : तैवानच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणाऱ्या घटकांना प्रोत्साहन देऊन अमेरिका मोठी चूक करत आहे. असं करून अमेरिकेनं तैवानला एका भयंकर परिस्थितीमध्ये आणून सोडलं आहे. पण त्यासोबतच, अमेरिकेला यासाठी न झेपणारी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी दिला आहे.China’s direct threat to the US, if it supports Taiwan, will have to pay a price
सरकारी वृत्तवाहिनीसोबत बोलताना अमेरिकेच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून तैवानच्या मुद्द्यावरून चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. तैवान स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र म्हणत असताना चीनने मात्र सातत्याने तैवानवर आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी दावे केले आहेत.
या पार्श्वभूमीवर अमेरिकेने तैवानच्या बाजूने आपली ताकद उभी करण्याचं जाहीर केल्यानंतर आता चीननं थेट अमेरिकेलाच धमकी दिली आहे. याआधी देखील चीननं अमेरिकेला इशारा दिला होता.
तैवानमध्ये सध्या लोकशाही शासन व्यवस्था आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून चीन तैवान हा आपलाच भाग असल्याचा दावा करत आहे. यासाठी चीनकडून आक्रमकपणे लष्करी आणि धोरणात्मक हालचाली केल्या जात आहेत. यामुळे तैवानची राजधानी तैपेईमधील वातावरण तणावपूर्ण झालं असून अमेरिकेमध्ये चिंता वाढली आहे. त्यामुळेच चीनला आवर घालण्यासाठी अमेरिकेने तैवानची बाजू घेतली आहे.
तैवानसमोर दुसरा मार्ग नाही. चीनमध्ये पुन्हा विलीन होण्याशिवाय तैवानकडे दुसरा कोणताही मार्ग उरलेला नाही, असे वँग यी म्हणाले. मात्र, तैवान आपल्या भूमिकेवर ठाम आहे. आम्ही एक स्वतंत्र राष्ट्र आहोत. आमचं स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही लढा देऊ, असा निर्धार तैवानने केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App