विशेष प्रतिनिधी
बीजिंग – चीनने त्यांचे अत्याधुनिक युद्धजहाज पाकिस्तानच्या नौदलाला देवून मैत्रीची नवी पेशकष सादर केली आहे. शांघाय येथे काल झालेल्या कार्यक्रमात पाकिस्तानच्या नौदल अधिकाऱ्यांकडे हे जहाज सुपूर्द करण्यात आल्याचे वृत्त ‘ग्लोबल टाइम्स’ने प्रसिद्ध केले आहे.China gave help to pakistan for naval
तुघरिल वर्गातील एकूण चार युद्धजहाजे पाकिस्तानसाठी बांधली जाणार असून काल त्यातील पहिले जहाज ताब्यात देण्यात आले. याशिवाय पाकिस्तानी लष्कराला चीनकडून आठ पाणबुड्याही मिळणार आहेत.चीनने निर्यात केलेले हे आतापर्यंतचे सर्वांत मोठे आणि अत्याधुनिक युद्धजहाज आहे.
पाकमध्ये दहशतवाद्यांपुढे इम्रान सरकारची सपशेल माघार, अवैध संघटनेच्या कार्यकर्त्यांना सोडणे भाग
चायना स्टेट शिपबिल्डिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (सीएसएससी) या कंपनीने या जहाजाची रचना आणि बांधणी केली आहे. पाकिस्तानने या जहाजाला ‘पीएनएस तुघरिल’ असे नाव दिले आहे. हे युद्धजहाज पाकिस्तानला मिळाल्याने हिंद महासागरात सत्तेचा समतोल साधला गेला आहे, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे चीनमधील राजदूत मोईन उल हक यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App