वृत्तसंस्था
कोलंबो : श्रीलंकेची स्थिती अराजक, यादवी या शब्दांच्याही पलीकडे गेली आहे. दिवाळखोर श्रीलंकेत हिंसाचार टोक गाठते आहे. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतरही जमावाचा संताप कमी होताना दिसत नाही. हिंसक जमावाने महिंदा राजपक्षे यांच्या वडिलोपार्जित घराला आग लावली. आंदोलकांनी हंबनटोटा येथील राजपक्षे कुटुंबाचे वडिलोपार्जित घर ‘मेदमुलाना वालवा’ जाळले. आगीत हे घर पूर्णपणे जळून खाक झाले. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. घरात आग लागल्याचे दिसून येत आहे. Chaos in Sri Lanka, Yadavi; Many houses, including the Prime Minister’s house, were set on fire
समर्थकांनी आंदोलकांवर हल्ला केल्यानंतर हिंसाचार
या घटनेनंतर श्रीलंकेतील परिस्थिती सतत बिघडत चालल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 200 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या खासदाराचाही समावेश आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी सोमवारी राजीनामा दिल्यानंतर देशातील परिस्थिती अधिकच बिघडली. हजारो सरकार समर्थकांनी आंदोलकांवर हल्ला केल्यानंतर हिंसाचार सुरू झाला.
– चिनी कर्जाच्या गर्तेत
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच चीनच्या कर्जाच्या गर्तेत सापडून आर्थिक आणीबाणीच्या संकटात सापडलेल्या श्रीलंकेत गेल्या 2 महिन्यांपासून अस्वस्थता आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महिंदा यांनी सोमवारी राजीनामा दिला. ट्विटरवर त्यांनी ही माहिती जनतेला दिली. त्यानंतर राजपक्षे समर्थकांनी विरोधकांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. तर राजधानी कोलंबोत अनेक ठिकाणी जाळपोळ केली. या सर्व गदारोळात शेकडो लोक जखमी झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App