वृत्तसंस्था
नवी दिल्ली – विविध प्रकारच्या कोट्यवधी ॲप्सची खाण असणाऱ्या गुगल प्ले स्टोअरने आता युजर्संची फेसबुकशी निगडीत माहिती चोरणारे नऊ ॲप डिलीट करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. वेबने हे ॲप शोधून काढले होते. माहितीच्या चोरीचा धोका टाळायचा असेल युजर्संनी दरमहा त्यांचा पासवर्ड बदलायलाच हवा असा सल्ला युजर्संना दिला आहे. Change password of Face book monthly
भविष्य, फोटो एडिटिंग, जंक फाइल्स क्लीनर, ॲप लॉकर, फिटनेस मॉनिटर आदी सेवांशी हे ॲप संबंधित होते. सायबर गुन्हेगार हे या ॲपच्या माध्यमातून युजर्संची फेसबुकशी निगडीत गोपनीय माहिती चोरण्याचे काम करत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली होती.
जगभरातील ५० लाखांपेक्षाही अधिक युजर्संनी हे ॲप डाउनलोड केले होते. या ॲपचा धोका लक्षात येताच गुगल प्ले स्टोअरने त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला आहे. अनेक युजर्संनी त्याचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची तक्रार केल्यानंतर या ॲप्सचा हा कारनामा उघड झाला होता.
हे ॲप त्यांची सेवा वापरणाऱ्या युजर्संना फेसबुक लॉग-ईनचा पर्याय उपलब्ध करून देत असत पण यामाध्यमातून युजर्संचे फेक लॉगइन पेज दाखवून युजर आयडी आणि पासवर्ड चोरला जात असे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App