वृत्तसंस्था
ओटावा : Justin Trudeau कॅनडात पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आपल्याच पक्षात घेरले गेले आहेत. त्यांचे सिंहासन संकटात सापडले आहे. अडीच महिन्यांपासून अल्पमतातील सरकार चालवणाऱ्या ट्रूडो यांच्या लिबरल पक्षाच्याच १३ खासदारांनी बंड केले आहे. लिबरल कॉकसमध्ये समाविष्ट असणारे हे खासदार ट्रूडोंच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. ३३८ सदस्यांच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ट्रूडोंकडे १५३ खासदारांचे समर्थन आहे.Justin Trudeau
विरोधकांकडे १८५ खासदार आहेत. ट्रूडोंना पहिला झटका सोमवारी बसला. उपपंतप्रधान क्रिस्टिया फ्रीलँड यांनी ट्रूडोंच्या धोरणांविरोधात राजीनामा दिला. २०२१ मध्ये वेळेआधीच निवडणूक घेऊन सत्तेत आलेल्या ट्रूडोंची सर्वात मोठी अग्निपरीक्षा फेब्रुवारीतील बजेट अधिवेशनात असेल. संख्याबळाच्या आधारावर बजेट संमत होणे अशक्य आहे. त्यामुळे जानेवारीत ट्रूडोंची गच्छंती अटळ मानली जाते.
सत्ता बदलल्यास भारतीयांना व्हिसा मिळण्याचा मार्ग सुकर
सतापरिवर्तनानंतर भारतावर काय परिणाम?
विरोधी कन्झरव्हेेटिव्ह पक्षाचे सरकार बनल्यास व्हिसा धोरणात बदलाची शक्यता. ट्रूडो सरकारकडून भारताबाबत कठोर धोरणांचा अवलंब सुरू आहे. त्यामुळे कठोर व्हिसा धोरणात निश्चितपणे सूट मिळू शकते.
कॅनडाच्या वर्तणुकीतील कटुतेचे कारण काय?
कॅनडातील लिबरल पक्षाचे धोरण नेहमीच भारताबाबत नकारात्मक राहिले आहे. ट्रूडो यांनी आपले सरकार वाचवण्यासाठी खालिस्तान समर्थकांना आश्रय दिला.
ट्रम्प फॅक्टरमुळे कॅनडाचे परदेश धोरण बदलेल?
ट्रम्प एक मोठा फॅक्टर असतील. ट्रम्प यांनी ट्रूडोंना गर्भित इशाराही दिला आहे. आंतरराष्ट्रीय कूटनीतीचा विचार करता हे भारतासाठी फायदेशीर ठरेल.
ट्रम्प यांचा कॅनडावर २५% कर लादण्याचा इशारा
ट्रूडोंवर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनीही वार केला आहे. ट्रम्प यांनी गुरुवारी पुन्हा सुनावले की, कॅनडावर २५% कर लादला जाईल. ट्रम्प यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, अमेरिकेकडून कॅनडाला दरवर्षी दिली जाणारी १०० कोटी डॉलरची आर्थिक मदतही बंद करण्यात येईल. ट्रम्प यांनी विजयी होताच ट्रूडोंविरुद्ध हल्लाबोल केला आहे. त्यामुळे घाबरलेल्या ट्रूडो यांनी फ्लोरिडात ट्रम्प यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. अमेरिकेच्या इतिहासात नवनिर्वाचित राष्ट्रपतींची शपथ घेण्याआधीच एखाद्या देशाच्या प्रमुखाने घेतलेली ही पहिलीच भेट!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App