बल्गेरियात ट्रकमध्ये सापडले 18 अफगाण नागरिकांचे मृतदेह : तस्करी करताना श्वास गुदमरून मृत्यू

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : बल्गेरियात एका कंटेनर ट्रकमध्ये 18 अफगाण नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांमध्ये सात वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. बल्गेरियन सरकारने शुक्रवारी सांगितले की, कंटेनरमध्ये सापडलेल्या 22 लोकांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रकमध्ये एकूण 52 प्रवासी होते आणि त्यांना बेकायदेशीरपणे बल्गेरियात आणले जात होते.Bodies of 18 Afghan nationals found in truck in Bulgaria suffocated while being smuggled

वृत्तानुसार, हे मृतदेह बल्गेरियातील लोकोर्स्को गावाजवळ सापडले आहेत. स्थानिक लोकांनी पोलिसांना फोन करून अज्ञात ट्रक आल्याची माहिती दिली. पोलिस तेथे पोहोचले तेव्हा आजूबाजूला मृतदेह पडलेले दिसले. ट्रकमध्ये छोटे कंपार्टमेंट बनवून त्यात माणसे भरल्याचे तपासात समोर आले. बल्गेरियाच्या आरोग्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, बहुतेक लोकांचा मृत्यू गुदमरल्याने आणि उपासमारीने झाला.



बल्गेरियात एका कंटेनर ट्रकमध्ये 18 अफगाण नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांमध्ये सात वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. बल्गेरियन सरकारने शुक्रवारी सांगितले की कंटेनरमध्ये सापडलेल्या 22 लोकांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रकमध्ये एकूण 52 प्रवासी होते आणि त्यांना बेकायदेशीरपणे बल्गेरियात आणले जात होते.

वृत्तानुसार, हे मृतदेह बल्गेरियातील लोकोर्स्को गावाजवळ सापडले आहेत. स्थानिक लोकांनी पोलिसांना फोन करून अज्ञात ट्रक आल्याची माहिती दिली. पोलिस तेथे पोहोचले तेव्हा आजूबाजूला मृतदेह पडलेले दिसले. ट्रकमध्ये छोटे कंपार्टमेंट बनवून त्यात माणसे भरल्याचे तपासात समोर आले. बल्गेरियाच्या आरोग्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, बहुतेक लोकांचा मृत्यू गुदमरल्याने आणि उपासमारीने झाला.

टर्कीमार्गे ट्रक बल्गेरियाला पोहोचला

आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, मृत्यू झालेल्यांमध्ये 6 किंवा 7 वर्षांचे बालक आहे. या घटनेत बचावलेले लोक थंडीने थरथर कापत होते. त्यांनी बरेच दिवस काही खाल्ले किंवा प्यालेले नव्हते. प्राथमिक माहितीनुसार, हा ट्रक अफगाणिस्तानातून निघाला होता, जो काही दिवसांपूर्वी तुर्कीमार्गे बल्गेरियाला पोहोचला होता.

यापूर्वी, 2019 मध्ये ब्रिटनमध्ये एक ट्रक थांबवण्यात आला तेव्हा त्यात 39 लोकांचे मृतदेह सापडले होते. बेकायदेशीरपणे ब्रिटनमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात या लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

Bodies of 18 Afghan nationals found in truck in Bulgaria suffocated while being smuggled

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात