वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : ट्विटरमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. यावेळी एलन मस्क यांनी ट्विटरचा थेट लोगोच बदलला आहे. म्हणजेच आता ट्विटरवरून निळा पक्षी गायब झाला आहे. या बदलानंतर यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. कारण, ट्विटरने ‘डॉगी’ हा आपला नवा लोगो बनवला आहे. ट्विटरचे मालक एलन मस्क यांनीही यासंदर्भात एक ट्विट केले आहे, त्यानंतर असे मानले जात आहे की, डॉगी हा ट्विटरचा नवीन लोगो असेल.Blue sparrow disappeared from Twitter! Elon Musk made ‘Doggy’ the new Twitter logo
खरं तर, सोमवारी रात्रीपासून यूजर्सना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर निळ्या पक्ष्याऐवजी कुत्रा दिसू लागला. हा लोगो पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले. ट्विटरच्या लोगोवर प्रत्येकाला कुत्रा का दिसतोय, असे प्रश्न विचारण्यास सुरुवात झाली. काही वेळातच, #DOGE ट्विटरवर ट्रेंड करू लागला. वापरकर्त्यांना वाटले की कोणीतरी ट्विटर हॅक केले आहे. मात्र यानंतर काही वेळातच एलन मस्क यांनी एक ट्विट केले, ज्यात ट्विटरने आपला लोगो बदलल्याचे स्पष्ट केले आहे.
मस्क यांचे ट्वीट – डॉगी चालवतोय गाडी
एलन मस्क यांनी मंगळवारी रात्री 12.20 च्या सुमारास एक फोटो ट्विट केला. ज्यामध्ये एक कुत्रा गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेला दिसत आहे आणि तो त्याचा परवाना वाहतूक पोलिसांना दाखवत आहे. या परवान्यावर निळ्या पक्ष्याचा फोटो आहे (जुना ट्विटर लोगो). त्यानंतर डॉगी ट्रॅफिक पोलिसांना सांगत आहे, “हा जुना फोटो आहे”. मस्कच्या या ट्विटनंतर ट्विटरवर केल्या जात असलेल्या विविध अंदाजांना पूर्णविराम मिळाला आणि एलन मस्कने लोगो बदलल्याचे स्पष्ट झाले.
मस्क यांनी याआधीही दिले होते संकेत
एलन मस्क यांनी यापूर्वीही डॉगीबद्दल संकेत दिले होते. त्यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये एक फोटो ट्विट केला होता. मस्क यांनी त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “ट्विटरचा नवीन सीईओ अप्रतिम आहेत.” फोटोमध्ये ट्विटरच्या सीईओच्या खुर्चीवर एक कुत्रा बसलेला दिसत होता. त्याच्या समोरच्या टेबलावर एक कागद ठेवलेला होता, ज्यामध्ये या कुत्र्याचे नाव फ्लोकी आणि खाली त्याचे पद मुख्य कार्यकारी अधिकारी असे लिहिले होते. या कागदावर ट्विटरचा लोगो म्हणजेच ब्लू बर्ड होता. मात्र, तेव्हा कोणीही विचार केला नव्हता की मस्क ट्विटरचा अनेक वर्षांचा लोगो बदलणार आहेत.
मस्क यांनी पूर्ण केले दिलेले वचन
ट्विटरचा लोगो बदलल्यानंतर एलन मस्क यांनी आणखी एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी लिहिले होते, ‘वचन दिल्यानुसार…’वास्तविक, या ट्विटमध्ये मस्कने 26 मार्चच्या जुन्या चॅटचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. या स्क्रीन शॉटमध्ये केलेल्या पोस्टमध्ये मस्क यांनी विचारले होते की, “नव्या प्लॅटफॉर्मची गरज आहे का?” यावर चेअरमन नावाच्या युजरने कमेंट करत ट्विटर विकत घ्या आणि त्याचा ब्लू बर्ड लोगो बदलून डॉगी करा असे लिहिले होते.
निळी चिमणी ट्विटरचा लोगो कशी बनली?
ट्विटर जुलै 2006 मध्ये सुरू झाले. त्याची स्थापना जॅक डोर्सी, नोहा ग्लास, इव्हान विल्यम्स आणि बिझ स्टोन यांनी केली होती. ट्विटरच्या संस्थापकांनी सांगितले होते की, हे एक क्लाऊड स्पेस प्लॅटफॉर्म आहे आणि पक्षी शांततेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे त्याचा लोगो असा ठेवण्यात आला होता. लॅरी टी बर्ड असे या निळ्या पक्ष्याचे नाव आहे. ज्याचे नाव प्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू लॅरी बर्ड यांच्या नावावर ठेवण्यात आले होते. ट्विटरचा मूळ लोगो सायमन ऑक्सले यांनी तयार केला होता. जो त्यांनी iStock वेबसाइटवर विकण्याची ऑफर दिली होती. हा लोगो ट्विटरने 15 डॉलरमध्ये विकत घेतला होता.
एलन मस्क यांनी ट्विटर 44 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतले
एलन मस्क यांनी गेल्या वर्षी ट्विटर ही मायक्रोब्लॉगिंग साइट विकत घेतली होती. यासाठी त्यांनी 44 अब्ज डॉलर्सचा करार केला होता. त्यांनी प्रति शेअर $54.2 या दराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म $44 बिलियनमध्ये विकत घेण्याची ऑफर दिली होती. पण नंतर स्पॅम आणि बनावट खात्यांमुळे त्यांनी तो करार रोखून धरला. मस्क या करारातून माघार घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु प्रकरण न्यायालयात पोहोचल्यानंतर त्यांनी वेळेत करार पूर्ण केला.
एलन यांनी ट्विटर का विकत घेतले?
एलन मस्क यांनी ट्विटर डीलनंतर एका ट्विटमध्ये याचा खुलासा केला आहे. त्यांनी लिहिले की, त्यांनी ट्विटर विकत घेतले जेणेकरून आमच्या भावी सभ्यतेमध्ये एक समान डिजिटल जागा असेल जिथे भिन्न विचारधारा आणि विश्वासाचे लोक कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराशिवाय निकोप चर्चा करू शकतील. सध्या एक मोठा धोका आहे की सोशल मीडिया अति उजव्या आणि अति डाव्या विचारसरणीमध्ये विभागला जाईल आणि आपल्या समाजात अधिक द्वेष पसरवेल. अधिक क्लिकच्या हव्यासापोटी बहुतेक पारंपरिक संस्थांनी त्याला हवा दिली, पण असे करून संवादाची संधी कुठेतरी गमावली आहे. यासोबतच ट्विटरला सर्वात प्रतिष्ठित जाहिरात प्लॅटफॉर्म बनायचे आहे, असेही मस्क यांनी म्हटले होते.
एलन पुढे म्हणाले होते की, ट्विटरसोबतचा करार पैसे कमावण्यासाठी केलेला नाही. मी हा करार मानवतेसाठी केला आहे. मी हे सर्व नम्रतेने करत आहे कारण असे लक्ष्य साध्य करण्यात अपयश शक्य आहे आणि ते स्वीकारले पाहिजे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App