विशेष प्रतिनिधी
जेरुसलेम – इस्राईलमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने देशाचे अध्यक्ष रुवेन रिवलिन यांनी विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनाच सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करण्याची संधी दिली आहे. Benjamin Netanyahu will next prime minister of Istrial
यामुळे गेल्या बारा वर्षांपासून पंतप्रधानपदावर असलेल्या नेतान्याहू यांना आपला कार्यकाल वाढविण्याची संधी मिळाली आहे. इस्राईलच्या १२० सदस्यांच्या संसदेत कोणत्याच पक्षाच्या नेत्याला बहुमत नसल्याने नेतान्याहू यांना सरकार स्थापण्याची संधी देत असल्याचे रिवलिन यांनी सांगितले.
भ्रष्टाचाराचे काही आरोप असलेले नेतान्याहू हे या पदावर राहण्यास अपात्र असल्याचे अनेक जणांचे म्हणणे असले तरी या पदावर राहण्यापासून त्यांना कोणताही कायदा रोखू शकत नाही, असे रिवलिन यांनी स्पष्ट केले. देशातील सर्व १३ पक्षांशी सल्लामसलत केल्यानंतर नेतान्याहू हेच केवळ सरकार स्थापन करू शकतात, असे चित्र असल्याचे रिवलिन म्हणाले.
इतर बातम्या वाचा…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App