वृत्तसंस्था
न्यूयॉर्क : Bangladesh बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार आणि नोबेल पुरस्कार विजेते प्रोफेसर मुहम्मद युनूस यांच्या ताफ्याला न्यूयॉर्कमध्ये निदर्शनांचा सामना करावा लागला. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाच्या कार्यकर्त्यांनी युनूससोबत असलेल्या विद्यार्थी नेते अख्तर हुसेनवर अंडी फेकली आणि त्यांना दहशतवादी ठरवले. जमावाने युनूसविरुद्ध घोषणाबाजीही केली.Bangladesh
युनूस आणि त्यांचे सहकारी संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) ८०व्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी रविवारी न्यूयॉर्कमध्ये पोहोचले. त्यांचा ताफा जेएफके आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघताच, तिथे उपस्थित असलेल्या अवामी लीग नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निषेध करण्यास सुरुवात केली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये निदर्शक अख्तर हुसेनवर अंडी फेकताना, त्यांना ‘दहशतवादी’ म्हणत आणि युनूस सरकारविरुद्ध घोषणाबाजी करताना दिसत आहेत.
विद्यार्थी चळवळीमुळे अख्तर प्रसिद्धीच्या झोतात
जुलै २०२४ मध्ये शेख हसीना सरकारविरुद्ध विद्यार्थी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांमध्ये अख्तर हुसेन यांचा समावेश होता. या आंदोलनाच्या दबावाखाली हसीना यांना ५ ऑगस्ट रोजी राजीनामा द्यावा लागला आणि नंतर त्यांनी भारतात आश्रय घेतला. त्यानंतर युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले.
तज्ज्ञांच्या मते, विद्यार्थी चळवळीत सक्रिय भूमिका बजावणारे अख्तर हुसेन यांनाही अवामी लीगचे कार्यकर्ते थेट शत्रू मानतात.
युनूस यांच्या ताफ्यात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) चे सरचिटणीस मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर आणि जमात-ए-इस्लामीचे नेते देखील उपस्थित होते.
तथापि, निदर्शकांनी त्यांना लक्ष्य केले नाही. अवामी लीग कार्यकर्त्यांचा राग प्रामुख्याने अख्तर हुसेन आणि युनूस यांच्यावर होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App