घरातून ओढून नेत क्रूरपणे मारहाण करत ठार मारले
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Bangladeshi बांगलादेशातील हिंदू नेते भावेश चंद्र रॉय यांची हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कट्टरपंथीयांनी प्रथम त्यांचे घरातून अपहरण केले आणि नंतर त्यांना मारहाण करून ठार मारले. शुक्रवारी हे प्रकरण उघडकीस आले. ही घटना बांगलादेशातील दिनाजपूर जिल्ह्यातील एका गावात घडली.Bangladeshi
प्राप्त माहितीनुसार भावेश चंद्र रॉय हे ५८ वर्षांचे होते. ते दिनाजपूरच्या बासुदेबपूर गावचे रहिवासी होते. गुरुवारी संध्याकाळी ४.३० च्या सुमारास रॉय यांच्या पत्नी शांतना यांना फोन आला. फोन केल्यानंतर अर्ध्या तासाने, चार जण दोन दुचाकींवर आले आणि त्यांनी रॉय यांना जबरदस्तीने त्यांच्या घरातून पळवून नेले. त्यांना जवळच्या नाराबारी गावात नेण्यात आले. तिथे अमानूष मारहाण करण्यात आली. यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
भावेश रॉय कोण होते?
भावेश रॉय हे बांगलादेश पूजा उद्यापन परिषदेच्या बिरल शाखेचे उपाध्यक्ष होते. ते जिल्ह्यातील हिंदू समुदायाचे एक आदरणीय नेते होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिरल पोलिस स्टेशनचे प्रमुख अब्दुस सबूर या प्रकरणात गुन्हा दाखल करत होते.
शुक्रवारी भारताने पश्चिम बंगालमधील हिंसाचाराबद्दल बांगलादेशी अधिकाऱ्यांचे विधान फेटाळून लावले आहे. भारताने बांगलादेशला त्यांच्या देशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्लाही दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक दिवस आधी सांगितले होते की, पश्चिम बंगालमधील घटनांवरील बांगलादेशच्या विधानांना आम्ही नकार देतो.
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांचे सचिव शफीकुल आलम यांनी बंगालमधील मुर्शिदाबादमधील सांप्रदायिक हिंसाचारावर भाष्य केले होते. बांगलादेशी अधिकाऱ्याने भारताला मुस्लिम अल्पसंख्याकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहन केले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App