मुख्य संशयित आणि त्याच्या साथीदाराने बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायाविरुद्ध हिंसा भडकवल्याबद्दल आणि सोशल मीडियावर जातीय द्वेष पसरवल्याबद्दल दोषी असल्याचे कबूल केले आहे. न्यायालयाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
वृत्तसंस्था
ढाका : मुख्य संशयित आणि त्याच्या साथीदाराने बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायाविरुद्ध हिंसा भडकवल्याबद्दल आणि सोशल मीडियावर जातीय द्वेष पसरवल्याबद्दल दोषी असल्याचे कबूल केले आहे. न्यायालयाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.Bangladesh Violence suspect confess to communal violence against Hindus, Accused Posted To Get More Followers On FB
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, शौकत मंडल याने रविवारी दंडाधिकाऱ्यासमोर कबूल केले की, त्याच्या फेसबुक पोस्टमुळे 17 ऑक्टोबर रोजी दुर्गा पूजेदरम्यान पीरगंज उपजिल्हामधील रंगपूरमध्ये हिंसा झाली होती. मंडलचा साथीदार रबिउल इस्लाम (३६) हा मौलवी असून त्याच्यावर जाळपोळ आणि दरोड्याचा आरोप आहे.
अधिकाऱ्यांनी पत्रकारांना सांगितले की, “शौकत मंडळ आणि त्याचा सहकारी रबीउल इस्लाम यांनी वरिष्ठ न्यायदंडाधिकारी देलवार हुसैन यांच्यासमोर (उत्तर-पश्चिम) रंगपूरमध्ये गुन्हा कबूल केला आहे.” मंडल रंगपूरच्या कारमायकेल महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी आहे
आणि अटकेनंतर त्याला सत्ताधारी अवामी लीगची विद्यार्थी संघटना स्टुडंट लीगमधून काढून टाकण्यात आले. bdnews24.com मधील एका वृत्तात, रॅपिड अॅक्शन बटालियनच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, त्याने त्याच्या फॉलोअर्सची संख्या वाढवण्यासाठी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर अपलोड केला होता.
683 जणांना अटक
अधिकाऱ्याने सांगितले की, रबिऊल इस्लामने शौकतला शुक्रवारी लाऊडस्पीकरच्या घोषणांद्वारे गावात मुस्लिमांना भडकावण्यात मदत केली. अहवालात म्हटले आहे की, पीरगंजमध्ये अफवा पसरल्यानंतर हिंसाचार झाला. एका हिंदू व्यक्तीने फेसबुकवर धार्मिक आक्षेपार्ह मजकूर टाकल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसाचारात सुमारे 70 हिंदू घरे जाळण्यात आली होती.
मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, कायदेशीर कारवाई अंतर्गत, आतापर्यंत किमान सात जणांनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. हिंसाचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये 24,000 संशयितांवर आरोप ठेवण्यात आले असून 683 लोकांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात 70 हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App