वृत्तसंस्था
ढाका : Bangladesh Violence बांगलादेशातील लक्ष्मीपूर सदर येथे शुक्रवारी रात्री उशिरा काही उपद्रवींनी एका घराला बाहेरून कुलूप लावून पेट्रोल टाकून आग लावली. आगीत जिवंत जळाल्याने एका 7 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर भाजले. हे घर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) चे नेते बिलाल हुसैन यांचे आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना रात्री सुमारे 1 वाजता घडली.Bangladesh Violence
आग लागल्याने बिलाल यांची 7 वर्षांची मुलगी आयशा अख्तर हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर बिलाल हुसैन आणि त्यांच्या इतर दोन मुली सलमा अख्तर (16) आणि सामिया अख्तर (14) गंभीर भाजल्या.Bangladesh Violence
बिलाल यांच्यावर लक्ष्मीपूर सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर दोन्ही मुलींना गंभीर अवस्थेत ढाका येथे पाठवण्यात आले आहे.Bangladesh Violence
बिलालच्या आईने घरात आग पाहिली
बिलालच्या घरात लागलेली आग त्याची आई हाजरा बेगम यांनी सर्वात आधी पाहिली. त्यांनी सांगितले की, त्या जेवण झाल्यावर झोपल्या होत्या. रात्री सुमारे 1 वाजता उठल्यावर त्यांनी पाहिले की, त्यांच्या मुलाचे पत्र्याचे घर जळत होते.
जेव्हा त्या बाहेर धावल्या, तेव्हा त्यांना दिसले की, घराचे दोन्ही दरवाजे बाहेरून बंद होते. नंतर बिलालने दरवाजा तोडून बाहेर पडण्यात यश मिळवले. त्यांची पत्नी नाझमा देखील चार महिन्यांच्या मुलासह आणि सहा वर्षांच्या मुलासह बाहेर आल्या.
त्यांनी सांगितले की, तिन्ही मुली एका खोलीत झोपल्या होत्या. दोन मुलींना गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आले, परंतु सर्वात लहान आयशा आगीत भाजून मरण पावली. हाजरा बेगम यांचा आरोप आहे की, गुन्हेगारांनी पेट्रोल टाकून घराला आग लावली, मात्र त्या कोणालाही ओळखू शकल्या नाहीत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App